प्राणी, पक्षी, झाडे-झुडपे पाहिल्याने मनाला आलेली निराशेची काजळी दूर होण्यास मदत होत असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

शेकडो लोकांचा या संशोधनासाठी समावेश करण्यात आला होता. पक्षी पाहणे, घराशेजारी झाडे-झुडपे असणे याचा मानसिक आरोग्यावर परिणाम घडून येतो. लोक जरी शहरात अथवा उपनगरांत राहात असले आणि त्यांच्या बाजूला पक्षी, झाडे-झुडपे असतील त्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

संशोधनामध्ये २७० कमी-अधिक वय असणाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. जे लोक मागील आठवडय़ाच्या तुलनेत जास्त वेळ घराबाहेर घालवतात, त्यांना चिंता आणि उदासीनतेची लक्षणे दिसू शकतात, असे या अभ्यासात आढळून आले.

ब्रिटनच्या एक्सेटर विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. रॉबिन (लाल पिसे असलेला तपकिरी रंगाचा पक्षी), ब्लॅकबर्ड, निळी चिमणी आणि कावळे हे घराबाहेर असणारे पक्षी पाहिल्यानेही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले.

मागील अभ्यासामध्ये विविध पक्ष्यांच्या प्रजाती ओळखण्याचे प्रमाण लोकांमध्ये कमी आहे. पक्ष्यांच्या प्रजाती ओळखण्यासाठी जास्तीत जास्त पक्ष्यांना पाहण्याची गरज आहे, असे त्यामध्ये म्हटले होते.

निसर्गाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे या अभ्यासात दिसून येते. नैराश्य कमी करण्यासाठी पक्षी पाहणे हा उत्तम उपाय आहे, असे विद्यापीठाचे डॉ. डॅनियल कॉक्स यांनी म्हटले आहे.