मेंदूच्या स्कॅन करण्यामुळे मनाला आलेली उदासीनता दूर करण्यासाठी मदत होते. यामुळे मानसोपचार अथवा मनाला उभारी देण्यासाठी नक्की कोणती औषधे द्यावीत हे समजण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. नैराश्य आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे नव्या अभ्यासामध्ये सूचित करण्यात आले आहे.

अमेरिकेतील एमॉरी विद्यापीठाच्या संशोधकांनी नैराश्य आलेल्या ३४४ रुग्णांवर १२ आठवडे उपचार केले. यामध्ये त्यांनी मनाला उभारी आणणाऱ्या दोन विविध औषधांची आणि मानसिक वर्तणुकीशी संबंधित थेरपी याचा वापर केला.

Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

अभ्यासाच्या सुरुवातीला रुग्णाच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्यामुळे उपचारासाठी नेमक्या कोणत्या उपचारपद्धतीचा वापर करता येईल, हे समजण्यास मदत झाली. एमआरआय स्कॅनमधून भावना निर्माण करणाऱ्या भागाची कार्यात्मक जोडणी शोधण्यात आली. तसेच मेंदूशी संबंधित इतर तीन भाग उपचारासाठी तपासण्यात आले.

सामान्यपणे, मेंदूच्या भागात सकारात्मक जोडणी असणाऱ्या रुग्णांसाठी थेरपीची आवश्यकता असते. ज्या रुग्णांची मेंदूशी जोडणी नकारात्मक असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता असते, असे संशोधकांनी सांगितले.

नैराश्य हे काही समान नसते. त्याचे कर्करोगाप्रमाणे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची पद्धतच वापरायला हवी. स्कॅन करण्यामुळे रुग्णाला नक्की कोणत्या प्रकारचे नैराश्य आले आहे हे समजण्यास मदत होते. तसेच यामुळे इतर उपचार टाळून रुग्णावर आवश्यक ते उपचार करण्यासाठी मदत होत असल्याचे हेलेन मेबर्ग या संशोधकाने सांगितले.

हे संशोधन ‘अमेरिकन जर्नल ऑफ सायकेट्री’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.