अकाली पांढरे होणारे केस हा  चिंतेचा विषय असून यामागे अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीचा साबण व शॅम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ. कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. मात्र, यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, उचित वेळी केस धुणे, संतुलित आहार, व्यायाम, उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाठी शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅल्शिअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्समध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.त्यामुळे, शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळण्याकरिता आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश करावा.
अकाली केस पांढरे होण्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :
एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
केस धुण्यासाठी साबण व शॅम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खूप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नका.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वाळविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा.
केसांकरिता मेहंदीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेहंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान चकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशनर असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांना मेंदी लावून झाकता येते. रासयनिक डायमधील द्रव्यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून १५ दिवसांतून एकदा मेहंदी लावावी.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Astrology By Date Of Birth Number 5, 14 and 23 nature and personality
Astrology By Date Of Birth : ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या सविस्तर
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज