दालचिनीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. दालचिनीमुळे शरीरात चरबी साठण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो असे सांगण्यात आले. या संशोधनात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा समावेश आहे. यात बारा उंदरांना बारा आठवडे दालचिनी सेवन करण्यास देण्यात आली. त्यानंतर उंदरांचे वजन कमी भरले. त्यांच्या पोटाजवळील चरबी कमी झाली होती, रक्तातील चरबीही इतर उंदरांच्या तुलनेत कमी झाली होती. रक्तातील साखर, इन्शुलिन यांची पातळीही योग्य प्रमाणात राहिली, ऑमनी अ‍ॅक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजीज या संस्थेच्या विजया जुतुरू या संशोधनात सहभागी असून त्यांनी म्हटले आहे की, ज्या उंदरांना दालचिनी दिली होती त्यांच्यात चरबी साठवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित रेणू कमी झाले व अँटीऑक्सिडंट अधिक तयार झाले त्यामुळे शारीरिक ताणही कमी झाला. घातक रेणूंपासून शरीराचे संरक्षण झाले. दालचिनीमुळे हृदयविकारास अटकाव होतो असे दिसून आले आहे. यात सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया मंदावणे हा आहे, असे सांगण्यात आले.