वसुबारसनंतर येणा-या धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशी धनत्रोयदशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच गणपती आणि धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. यादिवशी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रोयदशीला सोने- चांदीची खरेदी केली जाते. यंदा धनत्रोदशीच्या पूजेचा मुहूर्त हा जवळपास ४५ मिनिटांचा आहे.
धनत्रोदशी पूजेचे मुहूर्त
यंदा धनत्रोदशीच्या पूजेचा मुहूर्त हा २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून सुरू आहे. तर ६ वाजून २० मिनिटांपर्यंत तो राहणार आहे. जवळपास ४५ मिनिटांचा हा पूजेचा मुहूर्त असणार आहे. धनत्रोयदशीला करण्यात येणा-या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा ६.२९ ते ७. ५० पर्यंत असणार आहे.
धनत्रोदशी खरेदीचा मुहूर्त
धनत्रोदशी दिवशी सोन्या चांदीचे दागिने किंवा धातूच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. आजही काही जण शुभ मुहूर्तावरच दागिन्यांची किंवा वस्तूंची खरेदी करतात. यंदा वस्तू खरेदी ही दूपारी १.५५ ते ३. ८ हा शुभमुहूर्त करता येणार आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी ६.२९ मिनिटे ते ८.१२ हा देखील शुभमुहूर्त राहणार आहे.