वैज्ञानिकांनी डीएनए संगणकाची निर्मिती केली असून त्यात रक्तातील प्रतिपिंडांचा शोध घेता येतो त्यामुळे स्मार्ट औषधे विविध रोगांवर वापरता येतात, संधिवात व क्रोनस डिसीज यांसारख्या रोगात कमी दुष्परिणामात व कमी पैशात उपचार त्यामुळे शक्य होतील. एंधोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी सांगितले की, ही पद्धत एखादी दार सुरक्षा प्रणाली असताना कोणती व्यक्ती समोर उभी आहे हे पाहूनच उघडले जाते त्या पद्धतीने काम करते. जर कॅमेऱ्याने व्यक्तीची ओळख पटली तरच दार उघडले जाते. प्रा. मार्टन मर्क्‍स यांनी सांगितले की, निदान चाचण्यांमध्ये प्रतिपिंडांची ओळख पटवणे आवश्यक असते. त्यात बुद्धिमत्ता महत्त्वाची असते त्यासाठी डीएनए संगणकाचा वापर शक्य आहे. डीएनए हा जनुकीय माहितीचा वाहक असतो, पण डीएनए रेणू हे रेणवीय गणनात सुयोग्य असतात.

डीएनए रेणूतील क्रम हा इतर कुठल्या डीएनए रेणूशी अभिक्रिया करायची हे ठरवत असतो. त्यामुळे संशोधकांना हवी ती अभिक्रिया घडवण्यात मदत होते. आतापर्यंत डीएनए संगणकांचे उपयोग मर्यादित होते. डीएनए संगणकात डीएनए व आरएनए रेणू हे इनपुट असतात. प्रतिपिंड व डीएनए संगणक यांची सांगड घालण्यात मर्कस व सहकाऱ्यांना यश आले आहे. प्रतिपिंडांचे गुणधर्म पाहून यापुढे उपचार करणे शक्य होणार आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण