आपण खूप थकलेले असलो की चिडचिड होते. जेवण वेळेवर मिळाले नाही तरीही आपण नकळत वैतागतो. पण कारण दूर झाले की परत सगळे नीट होते. अशा वेळेला आपण त्या माणसाचा स्वभाव आहे असे म्हणत नाही. राग, लोभ, मत्सर, दिलखुलासपण, कुढेपण, भित्रेपण अशी अनेक विशेषणे लावलेली आपण पाहतो. पण जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा त्याला आपण अगदी सहज म्हणतो की त्या माणसाचा स्वभावाच तसला आहे! किंवा पूर्वी हा मुलगा असा नव्हता पण हल्ली तिरसटपणे वागतो. या सगळ्यामध्ये त्या माणसाची आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असतेच, परंतु या सगळ्या शरीरात चाललेल्या रासायनिक घडामोडींच्या प्रतिक्रिया असतात.

या सर्व रासायनिक क्रियांवर आपल्या मेंदूचे नियंत्रण असते. मेंदूला व्यवस्थित काम करायला अन्नातून सर्व घटक योग्य प्रमाणात मिळावे लागतात. त्यांचे प्रमाण बदलले की रासायनिक क्रियांमध्ये बदल होतो आणि मग दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमध्येही बदल होतो. हे जर सातत्याने चालू राहिले तर तो त्या व्यक्तीचा स्वभावाच बनतो.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?

१. प्रमाणबाहेर खाल्या गेलेल्या साखरेमुळे उदासीनता, टेन्शन, या गोष्टी घडतात. तर साखरेची पातळी खाली गेली तरीही खूप चिडचिड होते.

२. पचन संस्था, यकृत, थायरॉईड ग्रंथी, हार्मोन्स या सगळ्यांच्या रक्तातील पातळीवर आपली बरीचशी स्वभाव वैशिट्ये अवलंबून असतात.

३. माणूस हा रसायनांनी बनलेला आहे. या रसायनात अनेक घटक असतात. हे घटक आपल्याला अन्नातून मिळतात. म्हणून जर आपला आहार चांगला व पूर्ण असेल तर आपल्यातले विक्षिप्तपण कमी होऊ शकते.

४. अन्नातून मिळणाऱ्या घटकाचा वापर करून शरीराची बांधणी उभारणी सतत चालू असते. म्हणून एक दिवस पूर्ण आहार घेऊन चालत नाहीं तर नेहमीच पोषणमूल्य असणाऱ्या आहाराचा विचार करत राहावा लागतो.

५. कधी कधी आपल्याला खूप उल्हासित वाटते तर कधी कधी सगळे चांगले चालले असूनही आपल्याला उदासवाणे वाटत असते. तेव्हा आपण पडताळा करून पाहावा की आपल्या आहारातून काही कमी जातंय का? त्यासाठी आहार नेमका कसा असावा, कोणते घटक असावेत याची माहिती करून घ्यावी. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे घटकांची आवश्य़कता वेगवेगळी असते हे समजून घ्यावे.

६. triptophan या घटकाची आहारात जर खूप कमतरता असेल तर चटकन राग येणे, सतत उदासवाणे वाटणे असे होते. साखरेचे खूप कमी प्रमाण, जीवनसत्व ब, जीवनसत्व क हे जर खूप कमी खाल्ले गेले तर नैराश्य येण्याची शक्यता असते. या अन्नघटकांच्या सेवनाने हे नैराश्य कमी होते.

७. सध्या synthetic पावडरी वापरण्याचे प्रमाण पण खूप वाढले आहे. पण ज्या नैसर्गिक घटकांनी आपले शरीर बनले आहे त्याला नैसर्गिक गोष्टींचा जास्त उपयोग होतो.
त्यात हल्ली आपले जीवनही धकाधकीचे बनले आहे.

८. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. शेवटी आपल्या समाजाला पर्यायाने आपल्या स्वतःला आपणच वाचवू शकतो ते फक्त चांगली पोषणमूल्य असलेल्या आहाराने. मग कमी वेळात पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्याचे कौशल्य शिकून घेऊया आणि आरोग्य चांगले ठेऊया.

 

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ