कोल्ड ड्रिंक्स किंवा बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुनर्वापर करतो. या बाटल्यांमधलं कोल्ड ड्रिंक्स किंवा पाणी संपलं की त्या गृहिणी त्यात पाणी भरून त्यांचा पुन्हा वापर करतात. असं तुम्हीही करत असाल तर आताच सावध व्हा! कारण असं करणं अनेक आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. नुकताच ‘ट्रेडमिल’ने एक अहवाल प्रकाशित केलाय. ट्रेडमिलने या प्लॅस्टिक बाटल्यांची चाचणी केली. या चाचणीदरम्यान पाण्याच्या बाटल्यामध्ये त्यांना बॅक्टेरिया आढळले.

वाचा : स्मोकिंग सोडायचंय, मग हे घरगुती उपाय करा!

गांर्भीयाची बाब म्हणजे एका टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया आढळत नाही त्यापेक्षा कैक पटीने बॅक्टेरिया या प्लॅस्टिकच्या बाटल्यात आढळतात असे चाचणीदरम्यान समोर आले आहे. या बॅक्टेरियामधले ६० टक्के बॅक्टेरिया हे माणसांना आजारी पाडण्यास पुरेसे आहेत असेही यातून समोर आलंय. यासाठी कोल्डड्रिंक्स किंवा पाण्याच्या बाटल्यांचा पुर्नवापार न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. खरं तर या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचं काम झालं की ते त्या फेकून द्यायच्या असतात पण अनेक गृहिणी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हा आरोग्यावर होणारा याचा परिणाम लक्षात घेता या बाटल्या न वापरण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

वाचा : पाय दुखत असल्यास ‘हे’ करुन पाहा