गेल्या काही दिवसांत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच की फेसबुक युजरफ्रेंडली होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. दर महिन्याला नवनवीन फीचर्स आणून बदल करण्याच्या प्रयत्नात फेसबुक आहे. फेसुबकचे हे फीचर्स युजर्सच्याही पसंतीस उतरत आहे. आता फेसबुक आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच युजर्सना काहीतरी हटके अनुभवता येणार आहे.

फेसबुक आपल्या कॉमेंट बॉक्सवर अधिक काम करत आहे. तेव्हा काही दिवसांत युजर्सना कॉमेंटच्या मागे रंगीबेरंगी बॅकग्राऊंड ठेवता येणार आहे. स्टेटस अपडेट करताना जसा रंगीबेरंगी बॅकग्राऊंड, थीम वॉलपेपर ठेवण्याचा पर्याय युजर्सला देण्यात आलाय, तसाच तो कॉमेंट करताना देखील देण्यात येणार आहे. ‘द नेक्स्ट वेब’ने फेसबुकच्या या फीचरची माहिती दिलीये.  कलरफुल कॉमेंट बॉक्सनंतर फेसबुक आणखी एका फीचर आणण्याच्या तयारीत असल्याचं ‘द नेक्स्ट वेब’नं म्हटलं आहे. त्यानुसार युजर्सना आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीज् फेसबुकवर लिंक करता येणार आहेत. फेसबुकवर फोटो स्टोरीचा पर्याय फार पूर्वीपासूनच उपलब्ध आहे, पण आता त्यात हे नवं फीचरदेखील देण्यात येणार आहे.

DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज