रोजच्याआहारात पालेभाज्या असायलाच हव्यात, हे सगळे सतत सांगतात. पण या पालेभाज्यांमध्ये मेथी ही एक अशी भाजी आहे,  जी चवीला कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने कमालीची महत्वाची आहे.  मेथीच्या पानांचा उपयोग आहारात भाजी म्हणून, तर बियांचा उपयोग मसाला पदार्थांत होतो. दाण्यासारख्या दिसणाऱ्या या ‘मेथ्यां’मध्ये अतिशय आरोग्यकारी गुणधर्म आहेत. वनस्पती असली तरी त्यांचे महत्व आणि उपयुक्तता आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा मान्य करते. अनेकविध आजारात मेथ्यांबाबत संशोधन झाले आहे.

मेथ्या खाण्याची पद्धत

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

मेथ्यांचे दाणे कच्चे खाऊ नयेत. त्या भिजलेल्या किंवा मोड आलेल्या स्थितीतच खाव्यात.४ चमचे मेथ्या वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या चावून खाव्यात. त्यांची चटणी करून खाल्ल्यासही त्याचे फायदे दिसून येतात.
आरोग्यवर्धक फायदे

१. मधुमेह – टाईप-२ च्या मधुमेहाच्या रुग्णांना, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मेथ्यांचा निश्चित उपयोग होतो. मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते. यांचा दुहेरी फायदा होतो. यामुळे शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता वाढते शिवाय वजनही कमी होते. म्हणूनच मधुमेहाच्या  रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे उत्तम. ज्यांची रक्तशर्करा जास्त आहे अशांना ती नियंत्रित राहण्यास मेथ्यांचा उपयोग होतो. काही वेळा नियमित मेथ्या खाणाऱ्यांचे औषधाचे डोस कमी होण्याचीही शक्यता असते. मात्र हे करताना, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बदल करावेत.

२. अॅसिडिटी – ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे,  त्यांना शरीरातील आम्लता कमी होण्यासाठी मेथ्यांचा उपयोग होतो.

३. बद्धकोष्ठता – सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.

४. वजन कमी होते- मेथ्या खाल्ल्याने मेटाबॉलिक रेटही वाढतो, चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

५. त्वचा- मेथ्यांमुळे त्वचेवर येणारी मुरुमे कमी होऊन त्वचेचा तजेला वाढतो.

६. कोलेस्टेरॉल- रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो अॅसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

७. रक्तदाब- मेथ्यांमुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होतो. रक्तदाबाचे वाढलेले प्रमाण कमी होऊन कालांतराने गोळ्यांचे डोस कमी करता येतात.

८. उर्जा वाढते – मेथ्यांमुळे शरीरातील उर्जा वाढते. मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. नियमित मेथीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला अशक्तपणाची जाणीव कमी होऊन उत्साह आणि चैतन्य वाटत राहते.

९. केस गळणे- मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून, त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.

१०. स्त्रिया- तरुण स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे असे त्रास मेथ्यांच्या नियमित सेवनाने कमी होतात. प्रसूतीपश्चात मातांनी मेथ्यांचे सेवन केल्यास त्यांच्या स्तनपानात २० टक्क्यांनी वाढ होते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.रजोनिवृत्त स्त्रियांना होणारी डोकेदुखी, कंबर-पाय दुखणे, चक्कर येणे, निराश वाटणे, निरुत्साही वाटणे हे त्रासही कमी होतात.

-डॉ. अविनाश भोंडवे,

फॅमिली फिजिशियन