उन्हाळ्यात जलद उर्जास्रोताची आवश्यकता आहे? यासाठी शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकणाऱ्या आहाराचे सेवन करा. उन्हाळ्यात कलिंगड, काकडी आणि लिंबाचा तुमच्या आहारात समावेश करा. ऑरिफ्लेम इंडियाच्या आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी याबाबत काही टीप्स दिल्या आहेत. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकून तंदुरुस्त आणि ताजेतवाने हेण्यास याची मदत होईल.

कलिंगड : उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन हा उत्तम आहार मानला जातो. कलिंगड शरीरात क्षाराची निर्मिती करते. यात उच्च मात्रेत स्रिटलिन असते. आर्गिनिनच्या निर्मितीसाठी कलिंगड मदत करते. जे शरीरातील अमोनिया आणि अन्य अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. त्याचप्रमाणे कलिंगड पोटॅशिअमचे उत्तम स्रोत आहे, जे आहारातील सोडियमची मात्रा संतुलित करते. शरीराच्या अंतर्गत शुद्धतेसाठीदेखील ते महत्वाचे आहे.

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
grape summer cooler juice recipe
Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर

काकडी : शरीरातील अनावश्यक पदार्थांवर मात करण्यास मदत करते. यात असलेली पाण्याची उच्चतम मात्रा शरीरातील मूत्र प्रणाली व्यवस्थित कार्यरत ठेवण्यास मदत करते.

लिंबू : यकृतासाठी लिंबू खूप फायदेशीर आहे. शरीरातील यूरिक अॅसिड आणि अन्य अनावश्यक घटकांना घोळून यकृताची कार्यक्षमता वाढवते.

पुदीना : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात थंडावा ठेवण्यासाठी पुदीन्याचे सेवन करणे उत्तम ठरते. अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यासाठीदेखील पुदीन्याची मदत होते.

वाफेवर शिजविणे : भाज्यांना वाफेवर शिजविणे हा एक चांगला प्रकार आहे. त्यामुळे भाज्यांमधील पौष्टीकता नष्ट होत नाही.

व्यायाम : अनावश्यक घटक शरीरातून बाहेर काढण्यासाठी थोडा व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे. शरीरात अनावश्यक घटकांची वाढ झाली असल्यास कॅफीन आणि दारूपासून दूर राहावे.