अवकाशात अंतराळयानातून प्रवास करत असताना अनेक लहानमोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये थोडी जरी गडबड झाली तरी ते धोक्याचे ठरु शकते. काही वर्षांपूर्वी अवकाशमोहिमेवर गेलेल्या अंतराळवीरांनी आपल्या मोहिमेदरम्यान ब्रेड खाल्ला. गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्याने ब्रेडमधील लहानलहान कण अंतराळायानात सगळीकडे पसरले. त्यामुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी ब्रेडचे लहान-लहान कण अंतराळवीरांच्या डोळ्यात आणि इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये गेले होते. त्यामुळे मोहिम धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अशाप्रकारे डोळ्यात कण गेल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. तसेच तांत्रिक गोष्टीत ब्रेडमुळे अडथळा निर्माण झाल्यास मोहिमेत अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, आता यावर उपाय सापडला असून, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील अंतराळवीर आता त्यांच्या प्रवासादरम्यान सॅंडविचचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. बेक इन स्पेस या जर्मन कंपनीने नवीन ओव्हन आणि मिक्सर तयार केला आहे. यामुळे अंतराळात ब्रेड खाणे शक्य होणार आहे.

ताज्या ब्रेडच्या वास आनंद देणारा आणि मानसिकरित्या गुंतलेला विषय असतो. आमच्या या प्रकल्पाचे ध्येय अंतराळात ताजा ब्रेड बनविणे हे आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या माध्यमातून कमी गुरुत्वाकर्षण शक्ती असणारे ब्रेड बनवायचे ध्येय आहेत. यामध्य़े आपल्याला पाहिजे तसे कडक मऊ ब्रेड बनविता येणे शक्य होणार आहे. यामध्ये ब्रेड बनविण्याचे ओव्हनचे तापमान, त्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्यामुळे अंतराळयानात ब्रेड बनविण्याची कल्पना अंतराळवीरांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे.

एप्रिल २०१८ मध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याची युरोपीय स्पेस एजन्सीच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मिशनमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. असे कंपनीने लंडनमध्ये मागील आठवड्यात घेतलेल्या परिषदेत जाहीर केले.