लोकांना अनेक गोष्टींची माहिती नसते किंवा त्यांच्या अनेक गोष्टींबाबत गैरसमज असतात, अंधश्रद्धा असतात. त्या दूर करण्याऐवजी या त्रुटींचा फायदा घेण्याची वृत्ती बळावत चालली आहे.

आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्राबाबत आणि डॉक्टरबाबत रुग्णांच्या खूप अंधश्रद्धा आहेत. बऱ्याच डॉक्टरांकडे फिरलेले रुग्ण बऱ्याचदा वैतागलेले असतात. कारण त्यांना डॉक्टर लोकांकडून नीट मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना नेमकं काय झालंय, त्याचे परिणाम काय आहेत, नेमकी तीच औषधं का दिली आहेत, नेमक्या विशिष्ट तपासण्या का करून घ्यायला सांगितल्या आहेत, हे सगळे मुद्दे त्यांना नीट समजावून सांगितले जात नाहीत. वैद्यकीय क्षेत्राची लोकांना फारशी माहिती नसते. माहितीअभावी लोक योग्य प्रश्न विचारू शकत नाहीत, याचाही फायदा घेतला जातो.

Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र लोकांना वाटतं तितकं कठीण नाही. अंधश्रद्धा बाळगल्या नाहीत, तार्किक दृष्टिकोन बाळगला तर आजार सहज ओळखता येतात. पण तसं होत नाही, लोक तशा पद्धतीने विचार करीत नाहीत, करू शकत नाहीत, त्यामुळे फसतात. म्हणून आपला डॉक्टर आपल्याला फसवतो का हे समजून घ्यायला हवं. अर्थात याबरोबरच आणखीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, डॉक्टरांप्रमाणेच काही गोष्टींसाठी पेशंटही कारणीभूत असतात.

खूपदा असं होतं की, रुग्ण डॉक्टरकडे जातात. गर्दी असते. नंबर लावून ठेवावा लागतो. डॉक्टर नसतात. नंतर केव्हा तरी ते येतात. नंबर आला की रुग्ण आत जातो. आपल्याला काय झालंय सांगतो. डॉक्टर काही प्रश्न विचारतात. तपासतात. ट्रीटमेंटचा भाग म्हणून वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगतात. त्यासाठी कुणाकडे जा ते सांगतात. ही पहिली पायरी असते.

आता यातली गमतीदार गोष्ट अशी की, डॉक्टरकडे गेल्यावर गर्दी असते, त्यामुळे थांबावं लागतं. पण ज्याच्याकडे फारसे पेशंट नाहीत तो डॉक्टर बरोबर नाही, असं रुग्णांनाही वाटत असतं. आज डॉक्टरांकडे केवढी गर्दी होती, खूप वेळ बसावं लागलं हे ते बाहेर जाऊन इतर लोकांना जोरजोराने सांगतात. आपले डॉक्टर कसे खूप बिझी असतात, त्यांच्याकडे पेशंटची कशी गर्दी असते, त्यांची अपॉइंटमेंट कशी पट्कन मिळत नाही ते इतरांना सांगायला रुग्णांना फार आवडतं. डॉक्टरकडे जास्त रुग्ण म्हणजे जास्त फी असंही समीकरण आहे. पण अशा डॉक्टरला रुग्णही जास्त पैसे द्यायला आनंदाने तयार होतात.

Video : गाडीच्या बोनेटवरच पोलिसांनी तयार केलं ऑमलेट

काही ठिकाणी म्हणे असंही होतं की, क्लिनिकला यायच्या आधी डॉक्टर कंपाऊंडरला फोन करून विचारतात, की किती रुग्ण आले आहेत? पाचसात जणच आले असतील, जास्त गर्दी नसेल तर डॉक्टर स्वत:ही लवकर येत नाहीत. गर्दी व्हावी यासाठी वेळ जाऊ देतात. आलेल्या रुग्णांशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत, वेळ घालवत बाहेर गर्दी जमू देतात. हेच डॉक्टर बाहेर जास्त गर्दी जमली आहे असं दिसलं की पटापट रुग्ण बघतात. काही डॉक्टर तर आपली गाडी काढून चक्कर मारून इतरांकडे किती रुग्ण आहेत हे बघायलाही जातात, असंही सांगितलं जातं. सगळ्याच ठिकाणी असलेलं गर्दीचं राजकारण वैद्यकीय क्षेत्रातही आता आलं आहे. त्यामुळे गर्दी जास्त म्हणजे डॉक्टर चांगला या समीकरणातून रुग्णांनीही बाहेर यायला हवं.

आता काही अपवाद वगळता बहुतेक डॉक्टरांना त्यांच्याकडे असलेली औषधं रुग्णाला देऊन मोबदला घ्यायचा असतो, असं म्हटलं जातं. पेशंट आला आहे, पैसे काढायचेच आहेत तर द्या गोळ्या आणि इंजेक्शनं असा प्रकार असतो. ग्राहकाला दुकानात गेल्यावर जसा वीस रुपयांत त्यातल्या त्यात मोठा नारळ हवा असतो, तसं रुग्णांनाही दिलेल्या पैशाचा जास्तीत जास्त मोबदला हवा असतो. तशा त्यांच्या डॉक्टरकडूनही अपेक्षा असतात. त्यामुळे डॉक्टरही नुसतं रोगनिदान करून पैसे घेत नाहीत, तर चणेकुरमुऱ्यासारख्या गोळ्या दिल्या जातात, अशी चर्चा आहे. असे डॉक्टर आणि रुग्ण दोघांकडूनही इंजेक्शनला जास्त प्राधान्य असतं. कारण डॉक्टरला इंजेक्शन देऊन जास्त पैसे कमावता येतात तर रुग्णाला असं वाटतं की, इंजेक्शन दिलं की आपण लवकर बरे होतो. कधी कधी तर आपल्या समाजात इतका भोंदू खुळचटपणा चालतो की रुग्णाच्या बरोबर गेलेल्यालाही ‘तुमच्यात कमजोरी दिसते आहे’ असं म्हणून इंजेक्शन देऊन पैसे काढले जातात. रुग्णालाही डॉक्टरने इंजेक्शन दिलं नाही तर डॉक्टरला इंजेक्शन देता येत नाही किंवा त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा यायला लावायचंय आणि जास्त पैसे काढायचेत, आपल्याला लवकर बरं करायचं नाहीये असं वाटत असतं.

वाचा- …तिचा गगनचुंबी थरार!

खरं तर ज्या आजारावरच्या गोळ्या उपलब्ध आहेत, गोळ्या घेऊ शकतो आहे, मोठी इमर्जन्सी नाही, पेशंटला उलटय़ा होत नाहीयेत अशा वेळी इंजेक्शन द्यायची काहीच गरज नसते. इंजेक्शनमुळे अध्र्या तासात आराम पडतो असं काही रुग्णांना वाटत असलं तरी तसं काही नसतं. तो आराम गोळ्यांनीही पडू शकतो. पण इंजेक्शन देऊन जास्त पैसे मिळत असल्याने डॉक्टरही त्याच मार्गाने जातात. पण काही वेळा काही इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन होऊन रुग्ण दगावूही शकतो. पण त्यातूनही मार्ग काढला गेला आहे. इंजेक्शन तर द्यायचं आहे, पैसे तर घ्यायचे आहेत तर मग द्या पाव सीसी कॅल्शिअम ग्लुकोनेटसारखं निरुपद्रवी इंजेक्शन. ते दिलं की रुग्णालाही बरं वाटतं. तो म्हणतो की, अजिबात दुखलं नाही, आमच्या डॉक्टरचा हात कसा हलका आहे, वगैरे. पण रुग्णाला हे माहीतच नसतं की इंजेक्शन दुखण्याचा डॉक्टरचा हात हलकाजड असण्याशी काही संबंध नसतो, तर त्या इंजेक्शनमधून काय इंजेक्ट केलं आहे, याच्याशी असतो. एखाद्या डोसचं प्रमाण जास्त असेल, तर ते इंजेक्ट झाल्यावर एक्स्पान्शनमुळे दुखेल, एखादा कन्टेन्ट इरिटेटिंग असेल तर आत जाऊन इरिटेशनमुळे दुखेल. त्याचा डॉक्टरच्या हाताशी काहीच संबंध नसतो. आपला हात हलका आहे हे रुग्णाच्या मनावर ठसवण्यासाठी काही डॉक्टर पॉइंट दोन एमएल कॅल्शिअम ग्लुकोनेट तेही इन्शुलिन सीरिंजने देतात, असं म्हटलं जातं. त्याचा थेरपेटिक उपयोग काहीच नसतो किंवा अ‍ॅलर्जी किंवा नुकसान असं काहीच होत नाही. त्याचा पेशंटच्या आजाराशीही काही संबंध नसतो. माझं हे प्रॉडक्ट मला विकायचं आहे. एवढे पैसे घ्यायचे आहेत, अशी डॉक्टरची भूमिका असते, तर इंजेक्शन दिलं की आपल्याला लगेच बरं वाटेल असं रुग्णाला वाटत असतं.

बरेच डॉक्टर आपण कोणतं इंजेक्शन किंवा गोळ्या दिल्या ते लिहूनही ठेवत नाहीत ते यामुळेच. कारण साठसत्तर रुग्ण रोज येतात. रोज त्याच गोळ्या आलटूनपालटून द्यायच्या असतात. एक तापाची, एक दुखण्याची, एक स्टीरॉइड, एक अँटिबायोटिक, एक अँटिअ‍ॅलर्जी, भर म्हणून सोडामिंटच्या गोळ्या. एवढंच द्यायचं असेल तर ते लिहून ठेवायची काही गरज नसते. रुग्ण गोंधळू नये म्हणून या सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात एवढंच.

खरं तर तापाला एक किंवा अर्धी क्रोसीन, मेटॅफिन, अ‍ॅस्पिरीन यांची गरज असते. पण पेशंट म्हणतात, आम्ही ते क्रोसीन वगैरे घेत नाही. पण दवाखान्यात पॅरॅसिटॅमॉल दिलं की ते घेतात. ते तर क्रोसीनपेक्षा स्वस्त असतं. दर्जाही क्रोसीनएवढा नसतो. जो ताप तीनचार दिवसांत एरवीही जाणारच असतो, त्याबाबत ते दुसऱ्या दिवशी येऊ न डॉक्टरांना विचारतात की, औषध बदलू या का? खरं तर बदलायचं काहीच कारण नसतं. कारण तो ताप डायग्नोस झालेला नसतो. सिम्प्टमॅटिक औषधं देणं एवढंच हातात असतं. यात इन्व्हेस्टिगेशन खरं तर काय करणार? पण रुग्ण औषध बदलून द्या, मोठे डॉक्टर सांगा असं म्हणायला लागतो तेव्हा डॉक्टरची भूमिका महत्त्वाची असते. इथे पुन्हा डॉक्टरचा ठामपणा, रुग्णाचा त्याच्यावर असलेला विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपला रुग्ण बाहेर तपासण्या करायला जाऊन फसू नये, तिथल्या रॅकेटमुळे त्याला मानसिक तसंच आर्थिकदृष्टय़ा मनस्ताप भोगावा लागू नये यासाठी फॅमिली डॉक्टर स्वत:हून काळजी घेतो.

कारण आता परिस्थिती अशी आहे की, कन्सल्टंट खूप झाले आहेत. त्यांच्यात खूप स्पर्धा आहे. त्यांनी खूप पैसे गुंतवलेले असतात. त्यामुळे ते त्यांना परत मिळवायचे असतात. त्यामुळे खूप आक्रमक जाहिरातबाजी केली जाते. अर्थात असं विधान केलं तरी ते सिद्ध करता येत नाही. पण परिस्थिती अशी आहे ती ३० टक्के किकबॅक हा अलिखित नियम झाला आहे, असं सांगितलं जातं. काही ठिकाणी तर पहिल्या तीन रुग्णांचे १०० टक्के, बाकीचे तीस टक्के असेही प्रकार असतात. त्याचे हिशेब ठेवले जातात, वह्य़ा घेऊन प्रतिनिधी फिरतात. पाकिटं पोहोचतात, असं म्हटलं जातं. किकबॅक कायदेशीर करावं का अशीही चर्चा आहे. एखादा डॉक्टर रुग्णाला निव्वळ औषधं देऊन शंभरदीडशे रुपये कमावतो तर तोच डॉक्टर रुग्णाला एखाद्या कन्सल्टंटकडे पाठवून ३०४० हजार रुपये कमावतो, अशीही चर्चा आहे. कारण कन्सल्टंटकडे एकदीड लाखाचं बिल झालं तर त्याच्यावर ३० टक्के असा हिशेब असतो. अशा रीतीने कन्सल्टंटकडे रुग्ण पाठवून पैसे कमावणं हा सोपा मार्ग असतो. त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनर या पद्धतीने डिक्टेट करतात. माझा एक चांगला मित्र, युरॉलॉजिस्ट आहे. तो देशसेवेच्या भावनेने इंग्लंडमधली चांगली चाललेली पॅ्रक्टिस सोडून इथे आला. त्याने क्लिनिक थाटलं. त्याने जाहीर केलं होतं की मी कट्स देणार नाही. पण मी अगदी गरीब पेशंट पूर्ण विनामूल्य बघेन. त्यांचं ऑपरेशनही विनामूल्य करेन. तो परिसरातल्या सगळ्या डॉक्टर्सना जाऊन भेटला, पण तीन वर्षांत त्यांच्याकडून त्याच्याकडे एकही रुग्ण आला नाही.

आणखीही गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी गरज नसताना स्टेन्टिंग केलं जातं. हार्ट अ‍ॅटॅकसाठी हे स्टेन्ट वापरलं जातं. ते बनवणाऱ्या मोठय़ा कंपन्या डॉक्टरांना मोठय़ा प्रमाणावर इन्सेन्टिव्ह देतात असं कानावर आहे. त्यामुळे गडबडगोंधळ निर्माण करून रुग्णाला घाबरवणं, मोठे निर्णय घ्यायला लावणं असे प्रकार चालतात. उदाहरणार्थ, ७० वर्षांचा माणूस असेल, त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला खूप वर्षांची गॅरंटी असलेली महागडी, दीड लाखांची लेन्स लावणं अजिबात गरजेचं नसतं. कारण त्याला आता काही दिव्य दृष्टी येणार नसते. पेपर वाचणं, टीव्ही बघणं, चालताना नीट दिसणं या त्याच्या दैनंदिन गरजा असतात. त्याला बारीकबारीक तांत्रिक तपशील सांगून दीड लाखाची लेन्स त्याच्या गळ्यात बांधली जाते. लोकांनाही मी दीड लाखाची लेन्स लावली असं सांगायला आवडतं. पण त्याची खरंच गरज होती का, त्याचा खरंच फायदा किती, हे ते सांगू शकत नाहीत. इथे फॅमिली डॉक्टरची भूमिका महत्त्वाची ठरते.

पूर्वी रुग्ण येत ते मला आरामाची गरज आहे, मला चारपाच दिवसांची ट्रीटमेंट द्या असं स्वत:हून सांगत. पण आता रुग्ण डॉक्टरांना म्हणतात की, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण मला लगेच बरं करा. मला कामावर जायचंय, सुट्टी नाही, वगैरे. घरी बसायला, आराम करायला रुग्णांकडे आज वेळच नाहीये.

(शब्दांकन : वैशाली चिटणीस)

सौजन्य- लोकप्रभा