ब्लॅक टीला ‘ऑलराऊंडर’ म्हटले जाते. तोंडाच्या समस्यांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उपाय म्हणून ब्लॅक टीचा फायदा होतो. भारतात चहा या पेयाला कोणत्याही वेळेला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. अनेकांचे चहा हे एक व्यसन आहे असेही म्हणतात. मात्र व्यसनापलिकडेही चहाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. याशिवाय या चहाचा रंगही अतिशय आकर्षक असा दिसतो. चहाच्या विविध फ्लेवर्समध्ये ब्लॅक टी आरोग्यासाठी सर्वाधिक उपयुक्त असतो कसा ते पाहूयात…

१. तोंडाची काळजी – तोंडात दातांमधील फटीत असणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी ब्लॅक टी अतिशय उपयुक्त ठरतो. खाल्ल्यानंतर योग्य पद्धतीने दात स्वच्छ न केल्यास दातावर एक प्रकारचा थर जमा होतो. हा थर घालविण्यासाठी ब्लॅक टी उपयुक्त ठरतो.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

२. अँटीऑक्सिडंट- ब्लॅक टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. यामधील पॉलिफेनॉल अतिशय उपयोगी असते. तंबाखू किंवा शरीरातील इतर विषारी रसायने यांच्यापासून शरीराचे संरक्षण करते. आपण नियमित खात असलेल्या भाज्या आणि फळांमधून मिळणाऱ्या अँटीऑक्सिडंटसपेक्षा ब्लॅक टी मधून मिळणारे अँटीऑक्सिडंटस वेगळे असतात. त्यामुळे शरीराचे संरक्षण करण्यासाठी नियमित ब्लॅक टी घेणे आवश्यक आहे.

३. हाडांच्या बळकटीसाठी – जे लोक नियमित ब्लॅक टी घेतात त्यांची हाडे ब्लॅक टी न घेणाऱ्यांपेक्षा बळकट असतात असे एका संशोधनातून समोर आलेय. मात्र जे लोक ब्लॅक टी घेत नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांना अर्थ्रायटीस होण्याची शक्यता असते. ब्लॅक टीमध्ये फायटोकेमिकल नावाचा पदार्थ असतो ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो.

४. मधुमेह होण्याची शक्यता कमी – जे लोक दिर्घकाळापासून ब्लॅक टी घेतात त्यांच्यात मधुमेह होण्याची शक्यता कमी असते. मधुमेह झालेल्यांमध्येही हे प्रमाण आटोक्यात राहण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होतो. अशा लोकांनी दिवसातून किमान १ ते २ कप ब्लॅक टी घ्यावा.

टीप – कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.