स्मशानभूमीत किंवा बदलत्या पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना केवळ हृदयविकाराचा व लठ्ठपणाचाच धोका संभवतो असे नाही, तर त्यांना तीव्र पक्षाघातही होऊ शकतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
मानवी शरीर दिवस आणि रात्रीला ‘सर्केडिअन रिदम्स’ या २४ तासांच्या चक्राने सरावलेले असते आणि त्याचे नियंत्रण अंतर्गत जैविक घडय़ाळाने होते. केव्हा झोपायचे, केव्हा जेवायचे आणि अनेक शारीरिक प्रक्रिया केव्हा करायच्या हे ते आपल्या शरीराला सांगत असते, असे अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम हेल्थ सायन्स सेंटर कॉलेज ऑफ मेडिसिनचे डेव्हिड अर्नेस्ट म्हणाले.
बदलत्या पाळ्यांमध्ये (शिफ्ट डय़ुटी) काम करणाऱ्या व्यक्तीची झोपण्याची व उठण्याची वेळ, तसेच जेवण्याची वेळ अनियमित होत असल्याने ही व्यक्ती त्याच्या शरीरांतर्गत घडय़ाळाला आव्हान देते अथवा बुचकाळ्यात टाकते. अशी दीर्घ वेळ- विचित्र वेळ नव्हे- ही त्याच्यासाठी समस्या असतेच असे नाही, असे मत अर्नेस्ट यांनी व्यक्त केले.
उठण्याची व झोपण्याची तसेच जेवण्याची वेळ यात दर काही दिवसांनी होत राहणाऱ्या बदलामुळे शारीरिक घडय़ाळ गुंडाळले जाते (अनवाइंड) आणि त्यामुळे अशा व्यक्तींना त्यांचे २४ तासांचे नैसर्गिक चक्र कायम राखणे अवघड होते. दर काही दिवसांनी लोक झोपण्याची आणि उठण्याची वेळ पूर्णपणे बदलत राहिले, तर शरीराच्या घडय़ाळात अडथळा निर्माण होऊन त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
बदलत्या पाळीतील कामामुळे, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे होणारा रक्तपुरवठय़ातील अडथळ्याचा झटका येऊ शकतो, असे संशोधकांना आढळले आहे. मेंदू निकामी होणे, संवेदना आणि अवयवयांच्या हालचाली नष्ट होणे या संदर्भात पाळीतील कामाच्या वेळापत्रकानुसार काम करणाऱ्यांना पक्षाघाताचा अधिक जोराचा झटका येऊ शकतो, असे प्राण्यांना ‘मॉडेल’ म्हणून वापरून केलेल्या प्रयोगात आढळून आले आहे.