सतत तणावात राहणे हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. जगभरातील एक हजारपेक्षा अधिक जणांना मानसिक तणावामुळे हृदयविकाराचा झटका येतो. त्यातही अनेक महिलांचा समावेश असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून पुढे आले आहे.

ब्रिटिश संशोधकांनी ‘महिलांचा हृदयविकार’ यावर नुकतेच संशोधन केले. हृदयविकाराची केवळ अतिलठ्ठपणा, उच्च रक्तदाब हीच कारणे नसून अतितणाव हेही हृदयविकाराचे एक कारण असल्याचे या संशोधकांनी सांगितले. मानसिक व भावनिक तणावामुळे जगभरातील अनेक महिलांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचेही या संशोधकांनी सांगितले.

महिला या भावनिक असल्याने त्या नेहमीच तणावात राहतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, अतिकामामुळे येणारा थकवा, रोजगाराची समस्या, गरोदरपणा, नात्यांतील संबंध यांमुळे महिलांना भावनिक तणाव येतो. अतितणाव आल्यास हृदयविकाराचा झटका येतो, असे या संशोधकांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)