हवामान बदलाचा आरोग्यावर त्वरीत परिणाम होतो. सर्व वयोगटातील लोकांबरोबरच लहान मुलांना या बदलाचा सामना करताना लवकर समस्या निर्माण होतात. लहानग्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या बदलाशी जुळवून घेताना काही अडचणी येतात. तापलेली मुले चिडचिड करतात, रडतात, तापाने तोंडाला चव नसल्याने अन्न घेण्यासही तयार होत नाहीत. त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते. तापाबरोबरच खोकला, सर्दी, जुलाब असे त्रास होण्याचे प्रमाणही जास्त असते. अशावेळी लहानग्यांना ताप आल्यास पालकांकडून पॅरॅसिटॅमोल दिले जाते. मात्र हे औषध देताना कोणती काळजी घ्यायला हवी आणि घरच्या घरी करता येतील असे काही उपाय…

१. ताप आला की पालक मुलांना पॅरॅसिटॅमोल देतात. मात्र प्रत्येक ताप गंभीर असतोच असे नाही. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे कोणताही संसर्ग झाला की ताप येतो. १०० डिग्री फ़ॅरॅनाईट किंवा त्यापेक्षा अधिक ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरॅसिटॅमोल देणं सुरक्षित आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

२. लहान मुलांना ताप आल्यानंतर प्रथम त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवा. कोमट पाण्याने त्यांचं अंग पुसा. यानंतरही त्यांचं अंग गरम असेल तर पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स द्या किंवा सिरप द्या. तुम्ही देत असलेल्या पॅरॅसिटॅमोलच्या ड्रॉप किंवा सिरपची मात्रा काय आहे ? हे पाहूनच त्याचे प्रमाण ठरवा.

३. लहान मुलांना तापामध्ये पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या देण्यापूर्वी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. व्हायरल इंफेक्शनमुळे ताप येत असल्यास तो ३ ते ५ दिवस राहतो. म्हणजेच व्हायरसच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्रास कमी होतो.

४. लहान बाळाला ताप आल्यास कोणतेही औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 3 महिन्यांपेक्षा लहान असलेल्या बाळांसाठी स्वतःच्या मनाने कोणतेही औषध देणं त्रासदायकच आहे.

५. जास्त ताप आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाच्या प्रमाणापेक्षा जास्त औषध देणे धोकादायक ठरु शकते. याशिवाय कोणतेही ओरल ड्रग देण्यापूर्वी ताप तपासून पाहणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असते.

६. बाळाचे कोणतेही लसीकरण केले असल्यास त्यानंतर लगेजच पॅरॅसिटॅमोल देणं टाळा. लसीमुळे येणारा ताप ठराविक वेळात हळूहळू कमी होतो. त्यामुळे या तापासाठी पॅरॅसिटॅमोल देण्याची आवश्यकता नसते.