सर्वसाधारणपणे आपल्या रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असतो. परंतु, अनेकवेळा आपल्याकडून दह्याकडे दुर्लक्ष केले जाते. दह्याचे फायदे जाणून घेतल्यावर नक्कीच तुम्ही दह्याला दुर्लक्षित करणार नाही.

१. पचनास मदतकारक – तुमची पचनशक्ती दह्यातील न्यूट्रियंट्स सहजपणे शोषून घेते. त्याचबरोबर तुम्ही खालेल्या इतर अन्नघटकांमधील न्यूट्रियंट्स शोषून घेण्यात दही मदत करते. ज्यायोगे जेवणाचे सहज पचन होण्यास मदत होते. दह्याच्या सेवनाने उदरात निर्माण होणारी दाहकता कमी होण्यास मदत होते. अशी दाहकता अती तिखट भोजनामुळे निर्माण होते.

२. निरोगी हृदय – हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत हृदयविकाराची समस्या सर्वसाधारण झाली असताना, या समस्येस दूर ठेवण्यासाठी दही गुणकारी ठरते. उच्च रक्तदाबाचा धोका दह्यामुळे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास दह्याचे सेवन उपयुक्त ठरते.

३. दूध नापसंत असणाऱ्यांसाठी दही चांगला पर्याय – ज्यांना दूध पिणे आवडत नाही, त्यांना दही चांगला आणि आरोग्यवर्धक पर्याय ठरू शकतो. दह्यामुळे शरिरातील न्युट्रिशनमध्ये वाढ होण्यास मदत होते, जे काम दूधदेखील करते.

४. दह्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ – दह्यात असलेले उत्तम प्रतिचे बॅक्टेरिया रोगांशी लढण्याची शक्ती वाढवितात. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या वजायनल यीस्ट इन्फेक्शनपासून देखील बचाव करण्यास मदत करतात.

५. त्वचेसाठी गुणकारी – दह्यात व्हिटामिन ई आणि झिंक असल्याने याचा वापर घरगुती फेस पॅकच्या स्वरुपात त्वचेवर करता येऊ शकतो.

६. डँड्रफ – दह्यात लॅक्टिक अॅसिड असल्याने दह्यातील अँटी फंगल विशेषत्वे डँड्रफवर मात करण्यास मदत करतात.

७. वजन कमी करणे – सर्वात महत्वाचा फायदा. हल्ली अनेकजण वाढत्या वजनाच्या त्रासाने ग्रासलेले असतात. दह्यातील कॅल्शिअम शरिरातील कोर्टिसोलची मात्रा वाढू देत नाही. शरिरातील कोर्टिसोल हार्मोनल इंबॅलन्स, जाडेपणा आणि कॉलेस्ट्रॉलच्या वाढीचे कारण आहे.