अमेरिकेतील नामांकित फोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इनफोकसने काल भारतामध्ये दोन नवे फोन लॉन्च केले. टर्बो फाइव्ह प्लस आणि स्नॅप फोर अशी या दोन फोनची नावे आहेत.

इन फोकस स्नॅप या फोनमध्ये एक दोन नव्हे तर चक्क चार कॅमेरा देण्यात आलेले आहेत. १३ आणि ८ मेगापिक्सलचा असे दोन बॅक कॅमेरा या मोबाईलला असून आठ मेगापिक्सलचे दोन फ्रण्ट कॅमेरा मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत. बॅक कॅमेऱ्याबरोबर ड्युअल एलईडी फ्लॅश लाइट्स देण्यात आले आहेत. हा ड्युएल सिम फोन असून तो अॅण्ड्रॉइड ७ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. पूर्ण मेटॅलिक बॉडी असणाऱ्या या फोनमध्ये चार जीबी रॅम असून इंटरनल स्टोअरेज ६४ जीबी इतकी आहे. फोनमध्ये ऑक्टाकोअर मिडियाटेक प्रोसेसर आहे. फोनची स्क्रीन ५.२ इंचाची एचडी स्क्रीन आहे. फोनमधील बॅटरी तीन हजार एमएएच क्षमतेची आहे. तर फिंगरप्रिंट स्कॅनर होम बटणमध्येच इंटिग्रेट करण्यात आले आहे.

इन फोकस स्नॅपची बॅटरीची क्षमता कमी वाटत असल्यास युझर्स इनफोकस टर्बो फाइव्ह प्लसचा विचार करु शकतात. हा फोन इन फोकस स्नॅपपेक्षा आकाराने मोठा असण्याबरोबरच याची बॅटरही ४ हजार ९५० एमएएच क्षमतेची आहे. ५.५ इंच एचडी स्क्रीन असणाऱ्या या फोनला १३ मेगापिक्सल आणि ५ मेगा पिक्सल असे दोन बॅक कॅमेरा आहेत. फ्रण्ट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असून ऑक्टाकोअर मिडियाटेक प्रोसेसरवर चालणाऱ्या फोनला ३ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनची एक्सपांडेबल स्टोअर कॅपेसिटी ३२ जीबी आहे.

दोन्ही फोन फोरजी एलटीई नेटवर्कवला सपोर्ट करतात. टर्बो ५ प्लसची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे तर स्नॅप ४ ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. टर्बो ५ २१ सप्टेंबरपासून तर स्नॅप ४ २६ सप्टेंबर पासून अॅमेझॉन वेबसाईटवरून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.