टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जिओने स्पर्धक कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यास सुरुवात केली. एकामागे एक आकर्षक ऑफर्स लाँच करत कंपनीने आपल्या ग्राहकांना खूश केले. जिओच्या आकर्षक दरांमुळे इतर कंपन्यांनीही आपल्या दरांमध्ये नाईलाजाने का होईना बदल केले. मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंगची सुविधा देत जिओने एकप्रकारे मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांतीच केली आहे. यातही आणखी एक आनंदाची बाब म्हणजे मोफत इंटरनेट आणि कॉलिंगबरोबरच जिओ आपल्या ग्राहकांना आणखी एक मोफत सर्व्हिस देत आहे. मात्र, अजूनही अनेकांना याबद्दल फारशी माहिती नाही.

जिओने लाँचिंगपासूनच आपल्या ग्राहकांना मोफत कॉलर ट्यून सेवा दिली आहे. यामध्ये युजर कॉलर ट्यूनसाठी आपलं आवडतं गाणं सेट करू शकतो. इतर कंपन्यांकडून या सेवेसाठी ठराविक शुल्क आकारले जाते. मात्र, जिओने ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली आहे. पण हे कॉलर ट्यून कसे सेट करायचे याबाबत जिओच्या ग्राहकांनाही योग्य ती माहिती नाही. त्यामुळे पाहुयात काय आहे ही नेमकी कॉलर ट्यून सेट करण्याची प्रक्रिया…

१. जिओ ट्यून सेट करण्यासाठी गूगल प्ले किंवा अॅप स्टोअरमधून jiomusic अॅप डाउनलोड करा.

२. गाण्यांचे पर्याय पेजच्या उजव्या बाजूला दिसतात. तीन डॉट असणाऱ्या ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा. येथे JioTune ला निवडा. त्यानंतर तुम्हाला हवी ती कॉलर ट्यून सेट होईल.

३. या व्यतिरिक्त आपण प्लेअर मोडमध्ये असलेल्या एखाद्या गाण्याला सगळ्यात शेवटी दिसणाऱ्या सेट अॅज जिओ ट्यून बटणावर क्लिक करुनही एखादी ट्यून अॅक्टिव्ह करु शकता.