दोन महिन्यांपूर्वी संध्याकाळची गोष्ट! मिसेस कुलकर्णीचा घाबऱ्या आवाजात फोन आला. संचितचं बीपी वाढलं आहे, लगेच घेऊन येते! संचित हा कुलकर्णी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा, वय १४ र्वष आणि वजन ९० किलो. त्याचे आई आणि बाबा दोघे खासगी कंपनीत उच्च पदावर आणि चिरंजीव दिवसभर आजीच्या ताब्यात! त्यामुळे लाड सगळेच करतात. दिवसभर घरातील जेवणापेक्षा बाहेरचे चमचमीत पदार्थ संचितच्या फार आवडीचे. त्याच्या आई-बाबांबरोबर तो आला. त्याचं बीपी १५०/९० होता जे त्याच्या वयानुरूप खरंच जास्त होतं. बीपीची गोळी एवढय़ा लहान वयात कशी चालू करायची हा त्याच्या आईचा प्रश्न! मी प्रथम संचित दिवसभर काय काय खातो ते विचारलं! घरची भाजी पोळी त्याला फारशी आवडत नाही, म्हणून तो सामोसा, बर्गर, पिझ्झा, पावभाजी याच गोष्टी रोज आवडीने खातो. कोक, पेप्सी यांची मोठी बाटली तर तीन दिवसांत संपते- इति त्याची आई! संचितच्या वाढलेल्या बीपीचं कारण हे त्याच्या चुकीच्या आहारामध्ये आणि वाढलेल्या वजनामध्ये आहे हे त्याच्या आई-बाबांना समजावलं. आहारात बदल, वजन कमी करणं या उपायानी त्याचं ब्लडप्रेशर हळूहळू नॉर्मल होईल याची त्यांना खात्री दिली. दोन महिन्यांमध्ये संचित आणि त्याच्या आई-बाबांनी त्याच्या आहारात योग्य तो बदल केला, त्याचं वजन सहा किलोंनी कमी झालं. बीपीदेखील १३०/८० पर्यंत खाली आलं.

संचितसारखी अशी विविध वयांची अनेक मुलं-मुली आपल्याला आपल्या अवतीभवती दिसतात. बदललेल्या जीवनशैली बरोबरच बदललेल्या आहाराच्या सवयीच त्याला कारण आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात अन्न बनवण्यापेक्षा झटपट उपलब्ध असलेलं खाण्याकडे नवीन पिढीचा कल जास्त आहे. कारण त्यात वेळ वाचतो, एका जागी बसून खाण्याची गरज नसते आणि आकर्षक व चविष्टही लागतात. या झटपट पदार्थाना नाव मिळालं ‘जंक फूड’.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

जंक फूड या शब्दाचा वापर सर्वप्रथम अमेरिकेमध्ये १९५०च्या दशकात झाला. जंक फूडची व्याख्या करायची झाली तर ती अशी- ज्यामध्ये भरपूर स्निग्धांश, साखर आणि कॅलरीज आहेत, पण ज्यांचं पोषणमूल्य अगदी कमी किंवा शून्य आहे असे पदार्थ. यामध्ये बेकरीमध्ये बनवले जाणारे पदार्थ, आईस्क्रीम, विविध प्रकारचे चटपटीत वेफर्ससारखे पदार्थ, काबरेनेटेड शीतपेयं, काही प्रकारचे पिझ्झा व बर्गर्स असे अनेक पदार्थ येतात. आपण कोणत्याही वाण्याच्या दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये गेलो की, अशा पदार्थाच्या राशी आपल्याला खुणावतात. आकर्षक वेष्टण, कमी वजनाच्या पाकिटात उपलब्ध असलेले हे पदार्थ अगदी सहज परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्याने सर्वाना परवडतात. जंक फूडमध्ये येणारे पदार्थ लोकप्रिय होतात कारण –

–  सहज उपलब्धता, अन्न शिजवायचा त्रास नाही.

–  दिसायला आकर्षक आणि चवीला छान लागतात.

– सर्व आर्थिक स्तरांतील लोकांना परवडतील अशा आकारमान आणि किमतीत सहज उपलब्ध.

या सर्व कारणांमुळे जंक फूड हे लहान मुलं आणि तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलं आहे; परंतु या पदार्थाचं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे वैद्यकीय जगताची डोकेदुखी ठरली आहे. जंक फूडमुळे थोडय़ा कालावधीत दिसणारे दुष्परिणाम आणि दूरगामी दुष्परिणाम होत असतात.

या पदार्थामध्ये लहान आकारमानामध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे यांच्या सेवनाने लहान मुलं आणि तरुण वर्गात झपाटय़ाने वजन वाढून स्थूलतेचं प्रमाण वाढत चाललं आहे.

यातील बरेचसे पदार्थ बनवताना मैदा वापरला जातो. या पदार्थामध्ये तंतुमय घटक जवळजवळ नसतातच. त्यामुळे यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचं प्रमाण खूप वाढलं आहे.

या पदार्थात साखर खूप प्रमाणात असल्यामुळे यांच्या सेवनाने, दैनंदिन कामकाजासाठी लागणारी ऊर्जा तात्काळ मिळते, पण ती ऊर्जा शरीरात जास्त काळ टिकत नसल्याने थोडय़ा कालावधीनंतर निरुत्साही व शक्तिहीन झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे परत झटपट एनर्जी मिळवण्यासाठी परत तेच जंक फूडचे पदार्थ खाण्यासाठी पावलं वळतात. अशा प्रकारे हे पदार्थ खाण्याच्या दुष्टचक्रात लवकर अडकले जातो.

हे पदार्थ चविष्ट असल्याने रोजचा पोषक आहार आवडेनासा होतो आणि हळूहळू टाळला जातो. तसंच या पदार्थामधील घटकांची मेंदूला आवड निर्माण होते आणि एक प्रकारची व्यसनाधीनता निर्माण होते.

थोडय़ा अवधीत दिसणारे हे दुष्परिणाम! आता पाहू या दूरगामी दुष्परिणाम-

या पदार्थाच्या सेवनाने वजन वाढून लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. या लठ्ठ व्यक्तीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचं प्रमाण लहान वयातच दिसू लागलं.

यातील बरेचसे पदार्थ बनवताना तळले जातात. या तळण्याच्या प्रक्रियेने यामधील ट्रान्सफॅट या घातक पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि या पदार्थामुळे रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्टेरोल जास्त प्रमाणात जमा होतं. यामुळे या व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं दिसतं. लठ्ठपणामुळे या व्यक्तीमध्ये चारचौघांत वावरण्याचा आत्मविश्वास कमी होतो. उदासीनता, नैराश्य निर्माण होतं. जंक फूडचे दुष्परिणाम टाळण्यासाठी,  त्याच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी कठोर मनोनिग्रह हा एकमेव पर्याय आहे!

या पदार्थाच्या जाहिराती फार आकर्षक असतात. त्यात लहान मुलं आणि तरुण वर्गाला लक्ष्य केलं जातं. या समाज घटकांमध्ये विविध माध्यमांतून जंक फूड आणि त्याच्या दुष्परिणामांची माहिती करून देणं आवश्यक आहे – म्हणून हा लेखप्रपंच!
डॉ. पराग देशपांडे – response.lokprabha@expressindia.com