लिंबू आरोग्यासाठी चांगले असते असे आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र त्याचे नेमके फायदे काय आणि ते कधी घेतलेले जास्ती लाभदायक ठरु शकते याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व तर असतेच त्याशिवाय यातील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. संत्र्यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वापेक्षा लिंबामध्ये ते मोठ्या प्रमाणात असते. लिंबामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, तांबे आणि फॉलेटही मोठ्या प्रमाणात असते. लिंबू पाण्यामुळे शरीर आतून आणि बाहेरुनही चांगले होण्यास मदत होते. काय आहेत याचे फायदे समजून घेऊया…

पचनशक्ती सुधारते

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

लिंबू हे रासायनिक असल्याने पचनाच्या समस्यांसाठी ते उपयुक्त असते. लिंबामुळे यकृताकडून पित्त तयार होण्याची प्रक्रिया घडते आणि पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. पोट खराब झाले असल्यास ते पूर्वपदावर येण्यासाठीही लिंबूपाणी उपयुक्त असते.

तोंड सारखं कोरडं पडतंय?

शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यास उपयुक्त

लिंबूपाण्यामुळे शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते. हे घटक शरीराबाहेर पडण्यासाठी लिंबूपाणी शरीराला उत्तेजित करते. त्यामुळे शरीर शुद्ध आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

लिंबामध्ये फायबर पेक्टीन नावाचा एक घटक असतो. ज्यामुळे दिर्घकाळ पोट भरलेले असल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक कमी लागते आणि कमी अन्न खाल्ले जाते. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू घालून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

‘या’ आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त

त्वचेचा पोत सुधारण्यास मदत

लिंबामध्ये क जीवनसत्त्व असल्याने त्याचा त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. लिंबामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते तसेच लिंबूपाण्याचे नियमित सेवन केल्याने त्वचेला लवकर सुरकुत्या येत नाहीत. त्यामुळे रोज लिंबूपाणी प्यायल्यास त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहण्यास मदत होते.