मद्याचे व्यसन रोखणाऱ्या औषधाचा संशोधकांनी नुकताच शोध लावला आहे. रोज सायंकाळी हे औषध दिल्यास मद्यपेयींचे व्यसन सुटू शकेल.जगभरात मद्यपींची संख्या मोठी आहे. मद्यपानानंतर मानवामध्ये कोणकोणते बदल होतात आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे, या दृष्टीने आम्ही अनेक वर्षांपासून संशोधन करत होतो, असे ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी जॉन जेकब्सन याने सांगितले. उंदराला मद्य दिल्यानंतर मद्याचे त्याचे व्यसन रोखण्यासाठी संशोधकांनी त्यावर या औषधाचा प्रयोग केला.

प्रत्येक बदलानंतर आपले शरीर आणि मेंदू काही इशारा देत असतो. मद्यपानानंतर व्यसन रोखणारे हे औषध सेवन केल्यानंतरही मेंदूने काही इशारे दिले त्याची नोंद घेण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

मद्यपान केल्यानंतर मानवी शरीरातील मेंदूची भूमिका तपासण्याचा आमचा प्रयत्न होता, असे जेकब्सन यांनी सांगितले. मद्यपीला आम्ही तयार केलेले औषध दिल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. मद्यपीला सायंकाळी मद्यपान करण्याची इच्छा झाली नाही, असेही जेकब्सन म्हणाले. हे संशोधन ‘ब्रेन बिहेविअर अँड इम्युनिटी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.