सॅमसंग या कंपनीने त्यांचे सॅमसंग एस एट आणि सॅमसंग एस एट प्लस हे दोन प्रमुख फोन भारतात आणले आहेत.
सॅमसंग एस एट
सॅमसंग एस एट या मोबाईलमध्ये ५.८ इंचाची क्वाड एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच त्यावर सुपर एमोलेड ग्लास वापरण्यात आली आहे. या मोबाइलच्या पुढील बाजूस संपूर्ण स्क्रीन देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो. मोबाइलच्या मागील बाजूस बारा मेगापिक्सेलचा आणि पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलिझेशन व आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे कॅमेरा अस्थिर असतानासुद्धा किंवा कमी प्रकाशातसुद्धा अधिक चांगले फोटो येतात. या मोबाईलमध्ये फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी आहे. मेमरी कार्डच्या सहाय्याने तुम्ही मोबाईलची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. या मोबाइलमध्ये दोन सिम कार्ड आहेत. तुम्ही एका वेळेस दोन सिम किंवा एक सिम आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी त्यात फोरजी विओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी दिले आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम, एनएफसी (वायरलेस संपर्क तंत्रज्ञान) आहे. एस एटमध्ये सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. हा मोबाईल अँड्रॉइड सेव्हन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यात ३००० एमएएच बॅटरी देण्यात आली असून ती जलद चार्जिग करते. यात एक्सिनोस ८८९५ हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही विना अडथळा मोबाइलचा उपयोग करू शकता. या मोबाईलमध्ये वायरलेस चार्जिगही आहे. सॅमसंगने यात सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट आणि आयरीस सेन्सर वापरण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही बोटाच्या किंवा डोळ्यांच्या साहाय्याने मोबाइल अनलॉक करू शकता. या मोबाइलला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. एस एट सॅमसंगमध्ये पे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने दुकानातून सामान खरेदी करू शकता. हा मोबाईल काळा, निळा आणि सोनेरी या तीन रंगांत ऑनलाइन तसेच दुकानात उपलब्ध आहे.
सॅमसंग एस एट रु : ५७,९९०/-

सॅमसंग एस एट प्लस
सॅमसंग एस एट प्लस या मोबाईल मधे ६.२ इंचाची क्वाड एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच त्यावर सुपर एमोलेड ग्लास वापरण्यात आली आहे. या मोबाईलच्या पुढील बाजूस संपूर्ण स्क्रीन देण्यात आली आहे त्यामुळे मोबाईल आकर्षक दिसतो. मोबाईलच्या मागील बाजूस बारा मेगापिक्सेलचा तर पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलिझेशन व आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे कॅमेरा अस्थिर असताना तसंच कमी प्रकाशातसुद्धा अधिक चांगले फोटो येतात. या मोबाईलमध्ये फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी देण्यात आली आहे. मेमरी कार्डच्या सहाय्याने तुम्ही मोबाईलची मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड आहेत. तुम्ही एका वेळेस दोन सिम किंवा एक सिम आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी फोरजी विओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजी आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम, एनएफसी (वायरलेस संपर्क तंत्रज्ञान) आहे. एस एट प्लसमध्ये सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. हा मोबाईल अँड्रॉइड सेव्हन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यात ३,५०० एमएएच बॅटरी देण्यात आली असून ती जलद चार्जिग करते. यात एक्सिनोस ८८९५ हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही विना अडथळा या मोबाइलचा उपयोग करू शकता. हा मोबाईल वायरलेस चार्जिंग करतो. सॅमसंगने यात सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट आणि आयरीस सेन्सर दिले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बोटाच्या किंवा डोळ्यांच्या सहाय्याने मोबाइल अनलॉक करू शकता. या मोबाईलला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. एस एट प्लस सॅमसंगमध्ये सुद्धा पे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलच्या सहाय्याने दुकानातून सामान खरेदी करू शकता. हा मोबाईल काळा, निळा आणि सोनेरी या तीन रंगांत ऑनलाइन तसंच दुकानात उपलब्ध आहे.
सॅमसंग एस एट प्लस रु : ६४,९००/-

निखिल जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा