सकाळी उठल्यावर आपण काही गोष्टी अगदी नकळत करतो. मात्र यामधील काही सवयी या आपले वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतात. या सवयी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या बदलणेही काहीसे अवघड असते. मात्र वजनवाढीला कारणीभूत असणाऱ्या या सवयींकडे गांभिर्याने पहायला हवे आणि त्याबाबत वेळीच स्वतःमध्ये बदलही करायला हवेत. अनेकांना या सवयींमुळे आपले वजन वाढण्याची शक्यता आहे याबाबतच माहिती नसते. त्यामुळे या समस्येवर नेमके कशापद्धतीने उपाय करायचे याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी उठल्यावर व्यायाम न करणे, उशीरापर्यंत झोपून राहणे यामुळे आपले वजन नकळत वाढते. त्यामुळे उशीर न करता या गोष्टींत वेळीच बदल करणे गरजेचे आहे. शरीरावर विनाकारण वाढलेली चरबी तुम्हाला कमी करायची असल्यास योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पाहूयात सकाळच्या कोणत्या गोष्टींनी आपले वजन वाढण्याची शक्यता आहे.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
What happens to your body if you only eat foods cooked in olive oil
तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?

१. जास्तीची झोप – आणखी ५ मिनीटांची झोप आपल्या सगळ्यांनाच खूप प्रिय असते. मात्र पुरेशी झोप झाल्यानंतर घेतलेली अतीझोप वजन वाढण्यास कारणीभूत ठरु शकते. विविध अभ्यासांमध्ये झालेल्या संशोधनानुसार सामान्य व्यक्तीला ७ ते ९ तासांची झोप पुरेशी असते. त्याहून अधिक झोप घेणाऱ्या व्यक्तीचे वजन वाढण्याची शक्यता असते.

दूधाला असू शकतात ‘हे’ पर्याय

२. उठल्यावर अंथरुण न आवरणे – जे लोक सकाळी उठल्यावर आपले अंथरुण योग्य पद्धतीने साफ करुन आवरुन ठेवतात त्यांचे जीवन आरोग्यदायी असण्याची शक्यता असते. अशाप्रकारे सकाळी अंथरुण आवरुन ठेवल्यास रात्री चांगली झोप येण्यासही कारणीभूत ठरु शकते. नॅशनल स्लीप फाऊंडेशनने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे आपल्या स्वतःचे अंथरुण स्वतः टाकतात त्यांचा बीएमआय असे न करणाऱ्यांच्या तुलनेत नक्कीच कमी असतो. त्यामुळे झोपेतून उठल्यावर आपले अंथरुण आपण आवरुन ठेवल्याने कॅलरीज जळण्यासाठी उपयुक्त असतात.

३. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे – सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतो. सकाळच्यावेळी तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर तुमचे वजन वाढण्यास हे कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे जे सकाच्या वेळात पुरेसा सूर्यप्रकाश घेतात त्यांचा बीएमआय कमी असतो. मात्र दुसरीकडे जे सकाळच्या वेळी अंधाऱ्या खोलीत असतात त्यांचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते.

सायनसपासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

४. सकाळचा नाष्ता – जे लोक सकाळी योग्यप्रकारे नाष्ता करतात त्यांना दिवसभर भूकभूक होत नाही. सकाळच्या नाष्त्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने, कार्बोहायड्रेटस असणे गरजेचे असते. जे लोक योग्य पद्धतीने नाष्ता न करता थोडेसे काही खातात त्यांना थोडावेळातच परत भूक लागते. आणि एकाहून जास्तवेळा खाल्ल्यास वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. भूक मारणे हेही वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.