तुम्ही २० ते ३७ वयोगटातले आहात का? मग तुम्ही तुम्ही तुमच्या बाॅसपेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे साॅल्लिड जास्त काम करत आहात.

तुमच्या सगळ्यांच्या मनात असलेल्या भावनांना याच वयोगटातल्या जवळजवळ सगळ्या प्रोफेशनल्सनी दुजोरा दिलाय.१९८० ते २००० या काळाच जन्माला आलेल्या पिढीला ‘मिलेनिअल्स’ म्हणतात. या वीस वर्षात जन्माला आलेली जवळजवळ सगळी ‘बाळं’ आज प्रोफेशनल लाईफमध्ये स्थिरस्थावर झाली आहेत.

या मिलेनिअल्सच्या केलेल्या सर्व्हेमध्ये ८० टक्के लोकांनी ते त्यांच्या बाॅसपेक्षा कितीतरी जास्त काम करतात असं मत नोंदवलं. या वयोगटातले अनेकजण त्यांच्या आॅफिसमध्ये १२ तासांपेक्षा जास्त वेळ थांबत काम करतात. त्यातही २१ ते २४ या वयोगटामधले प्रोफेशनल्स अशा प्रकारची मेहनत बाकीच्यांच्या तुलनेत जास्त करतात.

दिल्लीमधल्या ‘टॅलेंटएज’ एज्युटेक फर्मने केलेल्या या सर्व्हेमध्ये  ही बाब समोर आली आहे. या फर्मने दिल्लासोबतच आठ भारतीय महानगरांमधल्या काॅर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या मिलेनिअल्ससोबत चर्चा करत त्यांचं मत जाणून घेतलं.

यापैकी अनेकजणांनी आपण जेवढी मेहनत करतो त्यामानाने आपल्याला पगार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

वाचा- वार्धक्याला दूर ठेवणारे औषध तयार करणे शक्य

रोज १२ तास काम करण्यामुळे कर्मचाऱ्याच्या कामावर कमालीचा नकारात्मक परिणाम होत असल्याचं अनेक सर्व्हेंमधून समोर आलं आहे. पण असं असतानाही एवढे तास काम अनेक कर्मचाऱ्यांकडून केलं जातं. कामाच्या तासांबरोबर कामाची गुणवत्ता राखणं हे महत्त्वाचं आव्हान या सगळ्यांपुढे आहे. तसंच एवढा जास्त वेळ काम केल्यानंतर होणाऱ्या इतर त्रासांपासूनही या कर्मचाऱ्यांना स्वत:चं रक्षण करावं लागतं. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोच. पण त्याचप्रमाणे त्यांचं पर्सनल लाईफ, सोशल लाईफ यावरही होणारा परिणामांनाही त्यांना सामोरं जावं लागतं.