एक पिढी जुन्या मुंबईमध्ये दिवाळी, गणपती अशा सणांच्या वेळी एक रंगीबेरंगी कापडाचा तागा आणत असे. त्यात एका कापडातून आईबाबांपासून छोटय़ा चिमुरडीपर्यंत सगळ्यांचे कपडे शिवले जायचे. आजच्या मॉल संस्कृतीमध्ये या पद्धतीचं हसं होतं. ‘कोण असं बँडवाले बनून जाणार?’ असा विचार येतो. पण हल्ली मोठमोठय़ा पार्टीज, समारंभात हा बँडवालेपणा ‘कुल’ समजला जाऊ लागला आहे. विशेषत मुलं आणि आई यांनी एकसारखे कपडे घालणं, हा नवा ट्रेंड बनू लागला आहे.

सेल्फी ते प्रोफेशनल फोटोग्राफपर्यंतच्या क्लिक-क्लिकच्या चलतीमुळे प्रत्येक पार्टी, समारंभात अपटुडेट बनून जाणं गरजेचं बनलं आहे. अगदी पार्टी सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्रीचा हँगओव्हर उतरेपर्यंत पार्टीचे प्रत्येक फोटोज, अपडेट्स सोशल मीडियावर टाकत राहणे, हा एक दंडकच बनलाय. अशावेळी प्रत्येक पार्टीमध्ये आपण सगळ्यांमध्ये उठून दिसलं पाहिजे, ‘पिक्चर-परफेक्ट’ असावं हे प्रत्येकालाच वाटतं. या मधलाच एक ट्रेंड म्हणजे आई आणि मुलांची मॅचिंग जोडी’.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

आई-मुलीचा घागरा, गाऊन्स, वन-पीस ड्रेस, साडी आणि आई-मुलाची जीन्स-शर्ट, सूट्स एकसारखी असावी म्हणून पार्टीज, समारंभापूर्वी डिझायनर बुटिक्सच्या खेपा घालू लागले आहेत.

वेस्टर्न लुक अधिक पसंतीचा

जीन्स, स्कर्ट, डे-ड्रेस, मॅक्सी ड्रेससारख्या प्रकारांमध्ये मॅचिंगची संकल्पना सहज राबवता येते. बेसिक ब्ल्यू जीन्स, कलर टी-शर्ट, स्ट्राईप शर्ट्स मुलांच्या आणि मोठय़ांच्या दुकानात सहज मिळतात. त्यासाठी एकच ब्रँड, डिझायनर बुटिक असण्याचीही गरज नसते. त्यामुळे सहलीला जाताना, पार्टी, छोटेखानी गेटटुगेदरला अशा प्रकारचा लुक पसंत केला जातो. कधी तरी संपूर्ण लुक नाही, पण संपूर्ण कुटुंबाच्या ड्रेसिंगमध्ये एखादा समान धागा असेल, असाही प्रयोग केला जातो. मग सगळ्यांच्या कपडय़ांचा रंग सारखा असेल किंवा एकाच रंगाचा टाय, स्कार्फ असू शकतो. सगळ्यांनी एकाच स्टाईलचे कपडे घालणे. आई आणि मुलींच्या ड्रेसचा पॅटर्न एक, पण रंग वेगवेगळे असाही प्रयोग केला जातो.

आई-मुलांचं ड्रेसिंग जुळवताना लक्षात ठेवायच्या काही टिप्स

  • सर्वात प्रथम ड्रेसचे कापड योग्य निवडा. लेस, नेटसारखे कापड दिसायला आकर्षक वाटत असलं, तरी त्यामुळे मुलांना खाज येणे, लाल चट्टे उठणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे ड्रेसचे कापड सुटसुटीत, वजनाला हलकं असेल याची काळजी घ्या.
  • ड्रेसचा पॅटर्नसुद्धा मुलांना नजरेत ठेवून बनवा. वजनदार घागरा, फ्लेअर ड्रेस दिसायला आकर्षक असेल, पण ते वजन मुलं पेलवू शकतीलच असं नाही.
  • बारीक एम्ब्रॉयडरी, नाजूक नक्षीकाम मोठे घागरे, साडय़ा यांवर शोभून दिसेल, पण मुलांच्या कपडय़ांवर ते नजरेससुद्धा येणार नाही. त्यामुळे िपट्र्स, एम्ब्रॉयडरी बोल्ड असू द्यात.
  • ड्रेस निवडताना फक्त तुमचा विचार न करता मुलांच्या लुकचाही विचार करा. त्यानुसार मुलांच्या पसंतीचे गुलाबी, आकाशी, लाल रंग, कार्टून पात्रं यांचा ड्रेसमध्ये समावेश असू द्यात.

खास टेलर-मेड लुकउ

मागच्या सीझनपासून अनेक देशीविदेशी बडे डिझायनर्स रँपवर मॉडेल्ससोबत लहान मुलांनाही आणू लागले आहेत. लहान मुलांच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश घेणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश. पण त्यातूनच आई आणि मुलं यांच्यासाठी सारखे कपडे बनविण्याची कल्पना पुढे आली. एरवीही पार्टीसाठी मुलींसाठी घागरे, डिझायनर साडय़ा शिवल्या जातात. पण तिचे कपडे आईसारखेच असतील, तर दोघींचा लुक फोटोजेनिकसुद्धा होतो आणि चारचौघांत उठूनही दिसतात. पटियाला, सलवार-कमीज, नऊवारी अशा खास पारंपरिक बाजाच्या लुकमध्ये तर हा प्रयोग आवर्जून केला जातो. ड्रेससोबतच मेकअप, हेअरस्टाईलसुद्धा सारखी असेल, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे आईचे केस लांब असल्यास मुलीला विगसुद्धा लावला जातो. अर्थात असे कपडे बनविण्यासाठी साईज चार्ट रुंदायला लागतो. त्यामुळे ब्रँडेड दुकानांमध्ये अजूनही हा ट्रेंड तितकासा रुळला नाही. पण डिझायनर बुटिक्समध्ये तुमच्या मागणीनुसार सहज अशा प्रकारचे कपडे तयार करून मिळतात. अर्थात त्यासाठी बऱ्यापकी मोठी रक्कम मोजावी लागते. पण त्यासाठीही लोकांची तयारी असते.

कुठे मिळतील?

गाऊन्स, घागरा असे कपडय़ांचे प्रकार डिझायनर बुटिक्समध्ये शिवायला लागतील. खारदांडा, जुहू, बोरिवली, कुलाबा, कॉजवे परिसरात अनेक डिझायनर बुटिक आहेत. तिथे तुम्हाला हे कपडे शिवून मिळतील. त्याची किंमत साधारणपणे पाच हजारांपासून सुरू होते. तुमच्या विश्वासातला टेलर असेल आणि त्याला लहान मुलांचे कपडे शिवता येत असतील, तर त्याच्याकडूनही ड्रेस शिवून घेऊ शकता. त्यामुळे ड्रेस कमी खर्चीकदेखील होईल. मंगलदास मार्केट, एल्को मार्केट, खार, अंधेरी येथील दुकानांमध्ये तुम्हाला यासाठी आकर्षक कापड मिळू शकतं. नेहमीच्या वेस्टर्न लुकसाठी काही मॉल्स, ब्रँडेड दुकानं पालथी घालावी लागतील.