अभ्यासकांचा निष्कर्ष; लहान मुलांमध्येही पर्यावरण जागृतीसाठी फायदा

रोज तीस मिनिटे चालण्याने नैराश्य कमी होते तसेच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो, आणि मानसिक आरोग्य सुधारते असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

निसर्गाच्या सान्निध्यात ज्या व्यक्ती जादा वेळ व्यतीत करतात त्यांना इतरांच्या तुलनेत कमी नैराश्य येते असे अभ्यासकांनी विषद केले आहे. त्यातही जास्तीतजास्त वेळ बाहेर खेळल्यास मुलांनाही फायदा होतो.  निसर्गाचा अनुभव घेत जी मुले मोठी होतात. त्यांच्यात प्रोढांपेक्षा पर्यावरणविषयक जागृती अधिक असते, असे क्विन्सलँड विद्यापीठातील  संशोधक डॅनियल शनन यांनी सांगितले.

बागेत जाणे, खेळणे हे तर आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. मात्र किती वेळ व्यतीत करावा, तसेच शहरांमध्ये याबाबत कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याचे मार्गदर्शन मिळाल्यास अधिकाधिक फायदे मिळतील असे क्विन्सलँड विद्यापीठातील प्रा. रिचर्ड फुलर यांनी सांगितले. कशा पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात राहावे, याची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत यायला त्यासाठी जनजागृती हवी अशी अपेक्षाही फुलर यांनी व्यक्त केली.

मोकळ्या जागेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात लोकांनी अधिकाधिक उपक्रम घ्यावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच हिरवाई असलेल्या ठिकाणांमध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेळ व्यतीत करावा, असेही प्रबंधात सुचवण्यात आले आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर सायंटिफिक’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने शहरी भागातील नागरिकांचे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करणे व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम हे विशद करण्यात आले आहेत.