साहित्य : हरभरा डाळ – एक वाटी गूळ – एक वाटी खोवलेलं ओलं खोबर – अर्धी वाटी भाजलेली खसखस – दोन चमचे वेलदोडे पावडर – एक चमचा जायफळ पावडर – अर्धा चमचा बदामाचे काप, काजू, चारोळे – आवडीनुसार सुक्या खोबऱ्याचे काप – पाव वाटी बेदाणे – आवडीनुसार नारळाच दूध – एक वाटी हळद, तेल – प्रत्येकी अर्धा चमचा

कृती : हरभरा डाळीत तेल, हळद घालून कुकरला शिजवून घ्या.नंतर जाड बुडाच्या भांडय़ात डाळ काढा. गूळ घालून परत छान उखळून घ्या. खसखस, ओला नारळ, सुक्या खोबऱ्याचे काप घालून गरजेपुरते पाणी घालून उखळा.नंतर जायफळ, वेलदोडे पावडर बदामाचे काप, काजू, चारोळे, बेदाणे घाला. शेवटी नारळाचे दूध घाला आणि सव्‍‌र्ह करा.

* नवरात्रात देवीच्या नैवेद्याला हा पदार्थ केला जातो. हैग्रीव्ह हे एका राक्षसाचे नाव आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूंनी या राक्षसाला वर दिला की त्याच्या नावाने एक पदार्थ केला जाईल आणि तो देवीच्या नैवेद्याला केला जाईल. तो हा पदार्थ आहे.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य : लोकप्रभा