साहित्य : वरई तांदळाचे पीठ आवश्यक इतके, वाटीभर गूळ, तांबड्या भोपळ्याच्या फोडी एक वाटीभर, थोडे मीठ, तूप

कृती : भोपळ्याच्या फोडी वाफवून चाळणीत निथळत ठेवा. गूळ बारीक चिरा, मग गूळ, भोपळा फोडी व थोडे मीठ एकत्र करा. यात मावेल, भिजेल तितकेच वरईचे पीठ घाला. सैलसर मळून घ्या. मग तव्याला हलकासा तुपाचा हात लावा. त्यावर नेहमीसारखे थालीपीठ लावा. मंद आचेवर तवा ठेवून दोन्ही बाजू लालसर भाजा. कडेने थोडे थोडे तूप सोडा, गरम गरम अतिशय उत्तम लागते. यामध्ये आवडीनुसार दाण्याचा कूट घालू शकता.