जुनाट चेतावेदनेशी संबंधित आजारावर प्रभावी औषध तयार होण्याच्या मार्गावर आहे. चेतावेदना प्रकारात दात किंवा चेहऱ्याच्या काही भागात थेट मेंदूत वेदना जाणवतात, त्या विकाराला ट्रायजेमिनल न्यूरालगिया असे म्हटले जाते. यात काही औषधे उपलब्ध असली तरी त्यांचे दुष्परिणाम अधिक आहेत. या विकारात अतिशय तीव्र वेदना दात व चेहऱ्याच्या भागात जाणवतात. या वेदना दाढी करणे, मेकअप करणे, शॉवर घेणे, बोलणे, ब्रशने दात घासणे या कृतीतही जाणवतात. काही वेळा जोराच्या वाऱ्याचा स्पर्श

झाल्यानेही वेदना तीव्र होतात. ट्रायजेमिनल नव्‍‌र्ह ही कवटी, चेहरा व तोंडाच्या खळग्यात असते, ती यात दुखावली जाते. या दुखण्यावर बीआयआयबी ०७४ हा पदार्थ शोधून काढण्यात आला असून त्यात वेदना कमी करता येतात, असे स्वित्र्झलडमधील झुरिच विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आले आहे. यामुळे सोडियम मार्गिका १.७ बंद केली जाते. यातून वेदना मेंदूपर्यंत पोहोचते व ठणका लागत असतो. यावर सध्या जी औषधे आहेत त्यात थकवा येणे, लक्ष न लागणे असे परिणाम होतात.

आता नवीन औषधामुळे हे दुष्परिणाम न होता वेदना कमी होतील, असे झुरिच विद्यापीठाचे दंतरोगतज्ज्ञ डॉमनिक एटलिन यांनी सांगितले. या पदार्थाच्या आणखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. साधारण दहा हजार लोकांमध्ये १३ जणांना दरवर्षी ट्रायजेमिनल न्यूरालगियाचे निदान होत असते. हा विकार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त होतो. मल्टिपल स्क्लेरॉसिस असलेल्या १ टक्के रुग्णांना हा विकार होतो.