ऑफीसमध्ये डेस्कवर काम असणाऱ्यांना आपले काम झाल्याशिवाय डेस्कवरुन अजिबात हलता येत नाही. कधीकधी तर कामाचा ताण इतका असतो की खरंच कित्येक तास तहान भूक विसरुन लोक एकाच जागी बसून काम करत राहतात. यामुळे आरोग्याच्या विविध समस्याही उद्भवताना दिसतात. मात्र फिलिपिन्समध्ये कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीने डेस्कवरुन उठून चक्कर मारुन येण्याचा एक नवा नियमच तयार केला आहे. या देशातील रोजगार विभागाने हा नियम नुकताच जाहीर केला आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये हा नियम लागू होणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात येत आहे.

या नवीन नियमानुसार डेस्कवर काम करणाऱ्यांनी दर दोन तासांनी पाच मिनिटांचा ब्रेक घेणे बंधनकारक आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, जास्त काळ एकाच जागेवर काम करत बसल्यामुळे कामाचा दर्जा कमी होण्याची शक्यता असते. पण तेच जर मधे थोडा ब्रेक घेतला तर पुढचे काम कर्मचारी अधिक जोमाने करु शकतो. यामध्ये कर्मचाऱ्यांनी कामाच्या मध्ये काही काळ उभे रहावे किंवा चालून यावे असे सांगण्यात आले आहे. तासनतास जागेवर बसून राहील्याने लठ्ठपणा, सांध्यांशी निगडीत समस्या यांसारखे विकार जडतात. एकाच जागी दीर्घकाळ बसल्याने हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा नियम अतिशय चांगला असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय एका संशोधनानुसार, जे लोक काम करताना दिर्जाघकाळ जागेवरुन उठत नाहीत त्यांचा मृत्यू लवकर होण्याचा धोका असतो. याशिवाय कर्मचाऱ्यांनी दिवसातील ठराविक काळ व्यायाम करणेही अत्यावश्यक असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे.

Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
DJ used for entertainment
आवाज वाढव डीजे तुला..
startup company, tax relief, money mantra, finance,
Money Mantra : स्टार्टअप कंपन्यांना कसा मिळणार कर दिलासा?