नोकियाने आपले बहुप्रतिक्षित असे स्मार्टफोन लाँच केल्यानंतर स्वस्तात मस्त असे आणखी दोन फोन सोमवारी लाँच केलेत. ‘नोकिया १०५’ आणि ‘नोकिया १३०’ असे हे दोन हँडसेट आहेत याची किंमत ९९९ रुपये असणार आहे.
नोकिया १०५ चे फिचर
– १.८ इंचाचा डिस्प्ले
– १५ तासांचा टॉक टाइम आणि एक महिन्याचा स्टँडबाय टाइम
– ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज
– ५०० टेक्स मेसेज आणि २००० कॉन्टॅक्ट सेव्ह करता येणार
– F.M. रेडिओ

वाचा : सावधान! व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या ‘या’ मेसेजला उत्तर देऊ नका

नोकिया १३० फिचर
– VGA इनबिल्ट कॅमरा
– MP3 प्लेअरला सपोर्ट
– १.८ इंचाचा डिस्प्ले
– ४ एमबी रॅम आणि ८ एमबी स्टोरेज
– ३२ जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी

१९ जुलैपासून या फिचर फोन्सची विक्री सुरू होणार आहे. नोकिया १०५ मध्ये ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहेत. ‘नोकिया १०५’ या सिंगल सिम हँडसेटची किंमत ९९९ रुपये आहे तर ड्युएल सिम असणाऱ्या हॅंडसेटची किंमत १,१४९ रुपये असणार आहे. जून महिन्यातच नोकियाने भारतीय बाजापेठेत ‘नोकिया ३’ आणि ‘५’, ‘६’ हे फोन टप्प्याटप्प्याने लाँच केले होते. जुलै महिन्याच्या अखेरीस नोकिया आपला ‘नोकिया- ८ ‘ हा महागडा फोन देखील लाँच करणार आहे. त्याची किंमत ४४ हजारांच्या आसपास असल्याची चर्चा आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला हा मोबाइल आहे. सिंगल आणि डयूएल सिम अशा दोन प्रकारात हा उपलब्ध असेल. या फोनचा डिस्प्ले ५.७ इंचाचा असणार आहे त्याचप्रमाणे १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश असणार आहे.