मोबाईल मार्केटमध्ये एकेकाळी अधिराज्य गाजवणारी नोकिया कंपनी पुन्हा नव्या जोमात स्पर्धेत उतरली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या नव्या फोन्सचे अनावरण केले.  आता नोकियाचे ‘नोकिया १५०’ आणि नोकिया ड्युअल सिम हे दोन्ही हँडसेट भारतात विक्रिसाठी उपलब्ध झाले आहेत.

गॅझेट ३६० च्या माहितीनुसार हे दोन्ही हँडसेट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही साईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यातल्या ड्युएल सिमची किंमत २०५९ च्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलीकार्बोनेटपासून तयार केलेली या फोनची बॉडी असणार आहे, त्यामुळे जरी या फोनला ओरखडे पडले तरी त्याचा रंग निघणार नाही असा दावा करण्यात आला आहे. २.४ इंचाचा डिस्ल्पे, २५ दिवसांची सँडबाय बॅटरी, एफएम, MP3 प्लेअर, स्नेक गेम, व्हीजिए कॅमेरा असे याचे वैशिष्ट्ये असणार आहे. नोकियाने आपले अँड्राईड फोन आधीच चीनमध्ये लाँच केले आहेत. नोकियाची अँड्राईड सिरिज जूनच्या आसपास भारतात लाँच होणार असल्याचे म्हटलं जातंय.

new FPI scam sebi
नव्या FPI फसवणुकीबाबत सेबीकडून गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा; नेमकी फसवणूक कशी करतात?
IPS Abhishek Verma overcharging parking ticket 60 rupees video viral
VIDEO : कायदे में चलो! पार्किंग चार्जच्या नावाखाली चक्क IPS अधिकाऱ्याची फसवणूक; अटेंडन्ट्सची तुरुंगात रवानगी
Why has the use of fintech increased
Money Mantra : फिनटेकचा वापर का वाढला आहे?
Aadhaar and thumb impression will disappear while searching for property online
प्रॉपर्टीचा ऑनलाइन शोध घेताना आधार, थंब इम्प्रेशन होणार गायब