एकेकाळी मोबाइलच्या बाजारपेठेवर वर्चस्व असलेल्या नोकियाने आपले स्थान स्मार्टफोनच्या आगमनांनंतर गमावले. आता अॅंड्रॉइड स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकियाने बाजारात पुन्हा मुसंडी मारण्याचे ठरवले आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया काही नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी नवीन मोबाइल लाँच केले जाणार आहेत. या कॉन्फरन्सचे प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे नोकियाचा पी १ हा स्मार्टफोन. याआधी चीनमध्ये नोकिया ६ हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

पी १ स्मार्टफोन या फोनचे औपचारिक लाँचिंग होण्याआधीच युट्यूब चॅनेल काँसेप्ट क्रिएटरवर फीचर्स लीक करण्यात आले आहेत. या फोनला मेटल फ्रेम दिसत आहे. पी १ ला होम बटन आहे. याला फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे. कार्ल झीस लेंस आणि ट्रिपल फ्लॅश असलेला कॅमेरा ही चित्तवेधक आहे. युएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि ड्युएल स्टिरिओ स्पीकर्स आहेत.

५.३ इंच इग्झो डिस्प्ले यामुळे गेमिंगचा अनुभव विलक्षण ठरेल. गोरिल्ला ग्लासमुळे स्क्रीनला कवच मिळेल. अॅंड्रॉइड नुगट ७.० या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालणार आहे. ६ जीबी रॅम आणि ८३५ स्नॅपड्रॅगन ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहे. याआधी नोकिया ६ हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनला ४ जीबी रॅम प्रोसेसर आहे. तर पी १ ला ६ जीबी रॅमचे. ३,५०० एमएएच बॅटरीला क्वीकचार्ज टेक्नॉलॉजीची साथ मिळाली आहे त्यामुळे फोन त्वरित चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकेल असा अंदाज आहे. फोनला अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा फोन बाजारात काहीसा उशिराने येईल.

नोकिया ६ चीनमध्ये उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली आहे. ५.५ फुल एचडी डिस्प्ले आणि २.५ डी गोरिल्ला ग्लास, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० एसओसी, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज, ड्युएल सिम आणि ३,००० एमएएच बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉस ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती. नोकिया ६ या फोनप्रमाणेच पी १ ला प्रतिसाद मिळेल असा विश्वास नोकियाने व्यक्त केला आहे.