अतिरिक्त ऑलिव्ह ऑइलसह समृद्ध आहार घेतल्यास स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता टिकून राहण्यास मदत होते. तसेच यामुळे स्मृतिभ्रंश आजारापासून संरक्षण होत असल्याचा दावा एका नव्या संशोधनामध्ये करण्यात आला आहे.

योग्य आहार, अहारामध्ये भाज्याचा जास्तीत जास्त समावेश या बाबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच यामुळे स्मृतिभ्रंशाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

अमेरिकेच्या टेम्पल युनिव्हर्सिटीमधील लेविस काट्झ स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. समृद्ध आहारामध्ये अतिरिक्त  ऑलिव्ह ऑइल असल्याने काही विशिष्ट घटकांपासून संरक्षण होण्यास मदत होत असल्याचे त्यांच्या अभ्यासात दिसून आले.

अ‍ॅनल्स ऑफ क्लिनिकल न्यूरॉलॉजी या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अतिरिक्त ऑलिव्ह ऑइल घेतल्याने मेंदूमध्ये अ‍ॅमलॉइड बिटा प्लाक आणि न्यूरोफिब्रिलरी टँगलची निर्मिती कमी होते. त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा आजार दूर होण्यास मदत होते.

आमच्या टीमने अतिरिक्त ऑलिव्ह ऑइलच्या संरक्षणात्मक फायद्यांची ओळख करून दिली आहे. ऑलिव्ह ऑइल मेंदूतील दाह कमी कमी करतो. ऑलिव्ह ऑइलमुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता टिकून राहण्यास मदत होत असल्याचे प्राध्यापक डोमिनिको प्राटीको यांनी म्हटले आहे.