आपल्या दररोजच्या आहारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा कांदा आरोग्यदायी आहे. गर्भाशयाचा कर्करोग झालेल्यांसाठी तर त्याचे महत्त्व अधिक आहे. कांद्यातील नैसर्गिक संयुगांमुळे गर्भाशयाचा कर्करोग झालेल्यांना तो परिणामकारक असल्याचा दावा जपानी संशोधकांनी व्यक्त केला आहे.

जपानमधील कुमामोटो विद्यापीठातील संशोधकांनी काद्यांतील नैसर्गिक संयुक्तांचा ओनीओनीनचे ‘ए’ (ओ एन ए) कर्करोगाची लागण असलेल्या गर्भाशयावर परीक्षण केले.  या वेळी संशोधकांना ओएनए या घटकांचा मज्जारज्जूच्या पेशीवरील कर्करोगाच्या वाढत्या संसर्गावर परिणामकारक  असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संस्थेच्या पाहणीनुसार, २०१४ या वर्षांत ईओसी नामक गर्भाशयाच्या कर्करोगावर हा सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळत असून पाच वर्षांतील निरीक्षणानुसार त्यातून वाचण्याची टक्केवारी ही केवळ ४० टक्केच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तर या आजारामध्ये कमी आयुष्यमानाचे प्रमाण हे जरी १ टक्का असले तरी जर कुटुंबात यापूर्वी या आजाराची लागण कोणाला असेल तर ही शक्यता ४० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. ८० टक्केपेक्षा जास्त रुग्णांना रासायनिक चिकित्सा (केमोथेरपी)च्या उपचारानंतर पुन्हा हा रोग उद्भवल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच अधिक परिणामकारक उपचार पद्धतीची गरज ही काळानुरूप भासत आहे. संशोधकांनी केलेल्या परीक्षणामध्ये ग्लासामधील जिवंत ईओसीला प्रतिकारक ठरणाऱ्या सूक्ष्म एम २ चे प्रमाण ओएनएच्या वापरामुळे अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.

यामुळे ओएनएचा प्रभाव एसटीएटी ३ याचा एम२ च्या पेशींमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याचे दिसून आले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)