स्मार्टफोन घ्यायचा झालाच तर आपल्याकडे शेकडो पर्याय उपलब्ध असतात. दरमहिन्याला वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन लाँच होतात. तेव्हा स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी ही स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. भारतीय ग्राहकांवर आपली पकड बसवण्यासाठी पॅनासॉनिकनं परवडणाऱ्या दरात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बुधवारी पॅनासॉनिकनं ‘ इलुगा आय २ अॅक्टिव्ह’ Panasonic Eluga I2 active फोन लाँच केला. १ जीबी रॅम आणि २ जीबी रॅम अशा दोन व्हेरिएन्टमध्ये हे फोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.  यातल्या १ जीबी रॅमची किंमत ७, १९० रुपये आणि २ जीबी रॅम असणाऱ्या व्हेरिएन्टची किंमत ७, ९९० रुपये असणार आहे. गोल्ड, रोझ गोल्ड आणि ग्रे अशा तीन रंगात हे व्हेरिएन्ट उपलब्ध असतील.

Panasonic Eluga I2 active चे फीचर्स
– अँड्राईड ७.० नोगट
– ड्युएल सिमकार्ड
– ५ इंचाचा एचडी डिस्प्ले
– ८ मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा
– ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
– १६ जीबी इनबिल्ड स्टोअरेज
– १२८ जीबी एक्सपांडेबल मेमरी