रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी बाजारात दाखल होत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यानंतर मोफत असणारा फिचर फोन लाँच करत जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का दिला आणि आता जिओने आपले नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर करत ग्राहकांना आणखी एक खूशखबर दिली आहे. जिओने नुकताच आपल्या विविध प्लॅन्समध्ये बदल केला असून काही जुने प्लॅन्स बंद करण्यात आल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याबरोबरच ग्राहकांना मिळणाऱ्या इंटरनेट स्पीडमध्येही बदल करण्यात आला आहे. हाय स्पीड डेटाचे लिमिट संपल्यानंतर त्यानंतर मिळणारा स्पीड जिओने आणखी कमी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना इंटरनेट वापरणे काहीसे अवघड होऊ शकते.

५२ रुपयांचे रिचार्ज – हा जिओचा सर्वात लहान रिचार्ज असून त्याची व्हॅलिडीटी ७ दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये ७ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. मात्र यामध्ये हायस्पीडचा केवळ १५० एमबीचा डेटा मिळणार आहे. म्हणजे ७ दिवसात एकूण १ जीबी आणि ५ एमबी इतका डेटा मिळेल. त्यानंतर मिळणाऱ्या डेटाचा स्पीड कमी असेल.

९८ रुपयांचे रिचार्ज – हा प्लॅन १४ दिवस व्हॅलिडीटी असणारा आहे. यामध्ये १४ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यातही रोज हाय स्पीडचा १५० एमबी डेटा वापरता येईल त्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल. म्हणजे ७ दिवसांसाठी २ जीबी आणि १० एमबी डेटा मिळणार आहे.

१४९ रुपयांचे रिचार्ज – या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. मात्र यामध्ये हायस्पीडचा रोज केवळ १५० एमबीचा डेटा मिळणार आहे. म्हणजे २८ दिवसात एकूण ४ जीबी आणि २० एमबी इतका डेटा मिळेल. त्यानंतर मिळणाऱ्या डेटाचा स्पीड कमी असेल.

३९९ रुपयांचे रिचार्ज – हा प्लॅन ७० दिवस व्हॅलिडीटी असणारा आहे. यामध्ये ७० दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यात रोज हाय स्पीडचा १ जीबी डेटा वापरता येईल त्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल.

४५९ रुपयांचे रिचार्ज – यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी अनलिमीटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. ८४ दिवस रो १ जीबी डेटा चांगल्या स्पीडने वापरता येईल. त्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल.

५०९ रुपयांचे रिचार्ज – यामध्ये ४९ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यात ४९ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा देण्यात येईल, जो स्पीडने असेल २ जीबीचा वापर झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल. हा स्पीड ६४ kbps इतका होईल. मात्र इंटरनेट अनलिमिटेड सुरु राहील.

९९९ रुपयांचे रिचार्ज – या प्लॅनची व्हॅलिडीटी ९० दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्येही अनलिमीटेड इंटरनेट आणि कॉलिंग देण्यात आले आहे. ग्राहकांना यामध्ये ६० जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड  ६४ kbps इतका होईल.

१९९९ रुपयांचे रिचार्ज – यामध्ये ग्राहकांना १८० दिवसांसाठी अनलिमीटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये १२५ जीबी डेटा देण्यात आला आहे. १२५ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ kbps कमी होईल.

४९९९ रुपयांचे रिचार्ज – या प्लॅनची व्हॅलिडीटी ३६० दिवस म्हणजेच १ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्येही अनलिमीटेड इंटरनेट आणि कॉलिंग देण्यात आले आहे. ग्राहकांना यामध्ये ३५० जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड  ६४ kbps इतका होईल.