कॅमिलो जोस सेला विद्यापीठातील संशोधन
रोज धावण्याचा व्यायाम केल्याने हाडांची घनता वाढते असे अभ्यासात दिसून आले आहे. धावण्याचे अंतर जेवढे जास्त तेवढे आरोग्यास हितकारक असते. वार्धक्याने हाडांची घनता कमी होऊ लागते. ती टिकवून ठेवण्यासाठी हा व्यायाम उपयोगाचा आहे. कॅमिलो जोस सेला विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार धावण्याच्या व्यायामाने हाडे मजबूत होण्यास मदत होते. पायाच्या तळव्यांमधील कॅलसेनियस हाडाचे गुणधर्म बदलतात, त्यामुळे त्यांचा काठिण्य निर्देशांक वाढतो, त्यावरून हाडाची घनता वाढल्याचे लक्षात येते. संशोधक बिट्रिझ लारा यांनी सांगितले, की हाडांचा टिकाऊपणा किंवा दणकटपणा याचा काठिण्य निर्देशांकाशी संबंध असतो. जास्तीत जास्त धावण्याने हाडांचे खनिज गुणधर्मही बदलतात. धावण्याचा व्यायाम हा हाडांची खनिज क्षमता टिकवण्यातही उपयोगी असतो. वयमानपरत्वे हाडांची खनिज क्षमताही कमी होत जाते. पोहणे किंवा स्केटिंग यात शरीराचे वजन वरचेवर तोलले जात असल्याने किंबहुना हाडांवरचा भार कमी असल्याने ऑस्टिओजेनिक फायदे होत नाहीत. धावण्याच्या सततच्या व्यायामाने मात्र चांगले परिणाम दिसून येतात, अर्थात हा व्यायाम तरुणपणातच जास्त शक्य असतो व त्याच्या मदतीने हाडांचे आरोग्य सुधारता येते, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. ‘अप्लाइड फिजिऑलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…