चिनी संशोधकांचा दावा

आहारामध्ये मीठ आवश्यक असते. ते अन्नाची चव वाढविते. पण अतिरिक्त मिठाचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असते. आहारात मिठाच्या अतिरिक्त वापरामुळे केवळ रक्तदाब बळावत नसून वयस्करांमध्ये यकृताला हानी पोहोचविण्याबरोबरच गर्भाच्या विकासावरही दुष्परिणाम होत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

आपल्या शरीराला अंशत: मिठाची गरज असते तर अमेरिकेन सरकारनुसार सुदृढ असलेल्या व्यक्तीला केवळ एक चमचा मीठ दिवसभरासाठी पुरेसे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, तर अन्य कार्यासाठी स्वादिष्ट खनिजातून मिळणारे सोडियमचे अंश हे शरीरातील पाण्याचे नियमन आणि मंज्जातंतूच्या कार्यावर नियंत्रण आणते. संशोधकांच्या मते, सोडियमचा अतिरिक्त वापर हा उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त यकृतालाही हानी पोहोचवू शकतो.

चीनमधील जिनान विद्यापीठाचे सुसाँग यांग आणि त्याच्या सहकार्याचा पेशीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांना शोधणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी एका उंदराला अतिरिक्त मीठ असलेला आहार दिला गेला आणि सभोवतालच्या खारटपणाचा पक्षाच्या गर्भाशयावरील परिणांमाचेही विश्लेषण केले गेले. या वेळी सोडियमच्या अतिरिक्त सेवनामुळे प्राण्याच्या यकृताबरोबरच पेशींच्या आकारातील विलक्षण बदल, मृतपेशींमध्ये झालेली वाढ आणि पेशींच्या निर्मितीत झालेली घट यातूनच पुढे फिबोरोसिस (व्रण असलेल्या ठिकाणच्या पेशीजालात पेशीजालांची निर्मिती) होत असते. या वेळी संशोधकांनी ‘क’ जीवनसत्त्वाच्या साहाय्याने इजा झालेल्या पेशींवर उपचाराचा प्रयत्न केला असता मिठाच्या अतिरिक्त सेवनाचा हा अंशत: परिणाम असल्याचे दिसून आले.

हे संशोधन कृषीसंबंधी आणि अन्न रसायनशास्त्राविषयीच्या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)