सॅमसंगच्या बहुप्रतिक्षीत अशा सॅमसंग गॅलक्सी एस ८ आणि सॅमसंग गॅलक्सी एस ८ प्लस हे दोन्ही फोन बुधवारी अमेरिकेत लाँच करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये सॅमसंगची बाजारावरील पकड काहीशी निसरडी होत चालली आहेत. त्यातून गेल्याचवर्षी सॅमसंगने लाँच केलेल्या गॅलक्सी नोट ७ मुळे सॅमसंगची चांगलीच नाचक्की झाली होती, म्हणूनच हा फोन कंपनीला तारू शकतो अशी आशा कंपनीला आहे.

हे दोन्ही फोन अँड्रॉईड ७.० नॉगट वर आधारित असणार असतील. सॅमसंग गॅलक्सी एस-८ ५.८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तर एस-८ प्लसमध्ये ६. २ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या एस ७ या सॅमसंगच्या सिरिजशी या फोनच्या कव्हर्ड एज मिळत्या-जुळत्या आहेत.या स्मार्टफोनमध्ये होम बटण नाही, पण त्याऐवजी इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. मिडनाइट ब्लॅक, ऑर्चिड ग्रे, आर्कटिक सिल्वर, कोरल ब्लू, मॅपल गोल्ड अशा पाच रंगात हा फोन उपलब्ध आहे. गॅलक्सी एस-८ आणि एस-८ प्लस २१ एप्रिल पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेत २१ एप्रिलपासून हा फोन उपलब्ध होईल याचवेळी तो भारतातही तो विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. गॅलक्सी एस-८ ची किंमत ५५,००० तर गॅलक्सी एस-८ प्लसची किंमत ६५,००० च्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सॅमसंगची बाजारावरील पकड ढिली झाली होती. नव्या फोनमुळे बाजारात आपण आपले स्थान निर्माण करू शकू असा विश्वास कंपनीला वाटत आहे. मागील वर्षी गॅलक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे सर्व स्मार्टफोन परत मागवण्यात आले होते. बॅटरीमध्ये तांत्रिक त्रुटी राहून गेल्याने नोट ७ चा स्फोट होऊ लागला होता. यामुळेच कंपनीला अब्जावधीचे नुकसान झाले होते. आता सॅमसंगने लाँच केलेले हे फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरून गुणवत्तेची परीक्षा पास होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.