स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील सॅमसंग या आघाडीच्या कंपनीने नवरात्रीच्य़ा मुहूर्तावर आपल्या नव्या मॉडेल्सची किंमती कमी करण्याचे ठरविले आहे. गॅलेक्सी एस ८ Galaxy S8 आणि गॅलॅक्सी ८ एस प्लस Galaxy S8 + या फोनच्या किंमती कमी होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या मोबाईलवर कंपनीने ४ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ४ हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. गॅलॅक्सी ८ एस प्लसची किंमत १ हजार रुपयांनी कमी कऱण्यात आली असून त्यावरही ४ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ ची किंमत ५७,९०० इतकी असून गॅलॅक्सी एस ८ प्लसची किंमत ७०,९०० इतकी आहे.

सॅमसंगच्या या दोन्ही मोबाईलची स्क्रीन सॅमसंग एस-७ प्रमाणेच ‘कव्हर्ड एज’ देण्यात आली असून एस-८ आणि एस-८ प्लस या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग आता सुरू झाले आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस-८ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस-८ प्लस या मॉडेल्सची प्री-बुकिंग किंमत अनुक्रमे ५७,९०० रुपये ६४,९०० रुपये इतकी आहे. सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस या स्मार्ट फोनची स्क्रीन अनुक्रमे ५.८ आणि ६.२ इंच इतकी असून या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फोनमध्ये ४-जीबी रॅम आणि १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून हे दोन्हीही फोन वॉटर तसेच डस्टप्रूफ आहेत.

याशिवाय, सॅमसंगचा बहुचर्चित असा गॅलेक्सी नोट 8 Samsung Galaxy Note 8 हा फोनही नुकताच लाँच झाला आहे. याचवेळी अॅपलचा आयफोन ८ लाँच झाल्याने या दोन्ही फोनमध्ये मोठी स्पर्धा रंगणार असल्याची चर्चा होती. मात्र सॅमसंगच्या फोनच्या प्रत्यक्ष विक्रीला महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हा ६.३ इंच आकाराचा क्वाड एचडी सुपर अमोल्ड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये सॅमसंगच्या एस ८ आणि एस ८ प्लसप्रमाणे इन्फिनिटी डिस्प्ले पुरवण्यात आला असून या फोनला मागील बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तर या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन अ‍ॅण्ड्रॉइड ७ या कार्यप्रणालीवर चालणारा असेल.