सणवार आले की विविध वस्तूंवरील ऑफर्सचा अगदी सुळसुळाट असतो. स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु असताना नवरात्रीचा मुहूर्त साधत सॅमसंग कंपनीने आपली अनोखी ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स नक्कीच विचारात घेऊ शकता. २५ सप्टेंबर रोजी सुरु झालेला सॅमसंगचा हा सेल ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सणासुदीला फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनदेखील स्मार्टफोनवर विविध ऑफर्स देत आहेत. तर सॅमसंगतर्फे ‘सॅमसंग शॉप अॅनिव्हर्सरी’ या सेलअंतर्गत ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोनच्या विविध मॉडेल्सवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला भेट देण्यासाठी सॅमसंगचा फोन खरेदी करु शकता. पाहूयात सॅमसंग स्मार्टफोनच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट आहे…

अवघ्या ३३ रुपयांत मिळणार १ जीबी डेटा आणि व्हॉईस कॉलिंगही

गॅलक्सी S8+ : सॅमसंगच्या गॅलक्सी S8+ स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने तब्बल ७ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. त्यामुळे ६०,९०० रुपये किंमतीचा हा फोन ग्राहकांना ५३,९०० रुपयांत उपलब्ध होणार आहे. याशिवाय एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड यूजर्सना ४ हजार रुपयांची अधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे एचडीएफसी कार्ड यूजर्सना हा स्मार्टफोन अवघ्या ४९,९०० रुपयांत मिळणार आहे.

गॅलक्सी On मॅक्स : या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन १५,९०० रुपयात मिळणार आहे.

गॅलक्सी On7 Pro, J3 Pro : हे दोन्ही स्मार्टफोन ऑफरमध्ये अनुक्रमे ७५९० आणि ७०९० रुपयात उपलब्ध आहे. यांची किंमत आधी ८९९० आणि ७९९० रुपये होती.

गॅलक्सी On Nxt : या स्मार्टफोनवर कंपनीने २ हजार रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना १३,९०० रुपयांत खरेदी करता येईल. आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सना यावर आणखी ५ टक्के सूट मिळणार आहे.

गॅलक्सी On5 : हा स्मार्टफोन या सेलमध्ये ६४९० रुपयांना मिळणार आहे.