दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रोयदशी. या दिवशी सोन्या चांदीचे दागिने आणि नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. काही जण यादिवशी घरात नवीन भांडी देखील विकत घेतात. नवीन वस्तू घरात शुभ शकुन आणतात. या दिवशी देवी लक्ष्मी घराघरात वास करते त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत संपन्नताही घरात यावी यासाठी नवीन भांडी आणि सोन्या चांदीचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. यामागे ही श्रद्धा असली तरी त्याचे शास्त्रीय कारण देखील आहे. धातूमुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. धातूमधून निर्माण होणा-या तरंग लहरी थेराप्यूटिक प्रभाव निर्माण करतात. त्यामुळे या दिवशी दिवशी सोने आणि चांदी खरेदीची परंपरा पुर्वापार चालत आली आहे.

वाचा : Dhanteras 2016 : जाणून घ्या का साजरी केली जाते धनत्रयोदशी!

तर दुसरीकडे धनत्रोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यामागे एक लोक कथाही सांगितली जाते. राजा हिमा याच्या १६ वर्षांचा पुत्र लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी मरण पावणार असे भविष्य एक ज्योतिष वर्तवतो. आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी त्याची पत्नी लग्नाच्या चौथ्या दिवशी दरवाज्यात सोन्या चांदीचे सिक्के पसरवून ठेवते. या दोन्ही धातूंवर प्रकाश पडून परार्वतित होणा-या किरणांनी सारे घर लख्ख प्रकाशात उजळून निघते. डोळे दिपवणा-या या प्रकाशामुळे यमाला मात्र काहीच दिसत नसल्याने त्याला घराबाहेरच थांबावे लागते. अशा प्रकारे वेळ निघून जाते आणि तिच्या पतीचे प्राणही वाचतात.

Dhanteras 2016 : ’धनत्रयोदशी’साठीचे शुभ मुहूर्त