फोनवर बोलणारी व्यक्ती आपल्याला दिसते व आपण तिच्याशी समोरासमोर बोलू शकतो, या वैशिष्टय़ांमुळे व्हिडीओ कॉलिंग जगभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची अ‍ॅप्स उपलब्ध आहेत उदाहरणार्थ स्काइप, व्हाॅट्सअॅप, हँगआउट्स, वाइबर, वी चॅट, गुगल डय़ुओ. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचा स्काइप अ‍ॅप्लिकेशन लोकप्रिय आहे. सध्या मेसेज पाठवण्यासाठी जसे व्हाट्सअ‍ॅप अग्रेसर आहे त्याचप्रमाणे व्हिडीओ कॉलिंगसाठी स्काइप प्रसिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्काइपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलवरून व्हिडीओ कॉल करू शकता. पण आता त्याचबरोबर व्हाॅट्सअॅप, फेसबुकवरूनही व्हिडीओ कॉल करता येतो. त्यामुळे स्काइपला स्पर्धा निर्माण झाली आहे. भारतातील लोकसंख्या आणि येथील वाढत जाणारा इंटरनेटचा वापर यामुळे अनेक कंपन्यांनी भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. मायक्रोसॉफ्टनेसुद्धा याच संधीचा उपयोग करून घेण्यासाठी स्काइपची नवीन आवृत्ती ‘स्काइप लाइट’ फक्त भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. भारतामध्ये इंटरनेटचा पसारा जेवढा वाढत चालला आहे त्या मानाने मात्र येथील इंटरनेटचा वेग कमी आणि अस्थिर आहे. या कारणांमुळेच मायक्रोसॉफ्टने खास भारतीय ग्राहकांसाठी हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध केले आहे. यामुळे टू जी किंवा थ्रीजी असतानासुद्धा तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता आणि तेसुद्धा विनामूल्य. यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च नाही फक्त तुमच्या मोबाइलमधे इंटरनेट असले पाहिजे. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे ते मायक्रोसॉफ्टच्या भारतातील हैदराबाद या कार्यालयात तयार केले आहे आणि अगदी सर्वसाधारण स्मार्ट फोनमध्येसुद्धा ते चांगले चालेल. सध्या तरी हे फक्त भारतातील ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. स्काइप लाइटमध्ये स्काइपसारखी अनेक वैशिष्टय़े आहेत. यात तुम्ही मेसेज पाठवू शकता, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकता. तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेटचा वेग चांगला असेल अथवा वायफायला जोडलेला असेल तर तुम्ही लावलेला कॉल हा एचडी असेल आणि जर तुमचा इंटरनेटचा वेग कमी असेल तर त्यानुसार तुमच्या कॉलची गुणवत्ता कमी-जास्त होईल. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये फक्त तेरा एमबी एवढीच जागा घेते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skype lite app microsoft indian users seven languages
First published on: 20-03-2017 at 18:35 IST