ब्रिटिश संशोधकांकडून ‘वेब टूल’ विकसित
दैनंदिन उपयोगासाठी स्मार्टफोनमध्ये विविध वेब टूल असतात. आता ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक आरोग्यदायी वेब टूल बनविले आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांचा उच्च रक्तदाब नियंत्रित राऊ शकतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिळालेल्या संकेतातून हानिष्कर्ष काढल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
दैनंदिन जीवनात उच्च रक्तदाबाशी निगडित उपचार पद्धतीसोबत हा बदल जाणवल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. पण ही माहिती मर्यादित स्वरूपातच असल्याने रुग्णांना या माध्यमातून उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, याबाबत अजूनही अज्ञान आहे.
या वेब टूलमध्ये रुग्णाकडून रक्तदाबाची नोंदणी, नाडीचे ठोके,जीवनमान, औषधाविषयीची माहिती, लक्षणे याबाबत माहिती विशद केली जाते. त्यावर मिळालेल्या माहितीच्या आधारावर वेबच्या माध्यमातून स्मार्टफोनवर जीवनमानात करावे लागणारे बदल, प्रोत्साहनपर संदेश आणि स्मरण संदेश पाठवून रुग्णाशी संवाद साधला जातो. या संकेतस्थळावर वेळोवेळी होणाऱ्या रुग्ण आणि आरोग्य तज्ज्ञामधील संवादाचे विश्लेषण केले जाते. त्यावरून सिस्टोलिक रक्तदाबाची सरासरी ७ एमएम एचजीपर्यंत खाली आल्याचे तर डायलोस्टिक रक्तदाबाचे प्रमाण ४.९ एमएम एचजीपर्यंत स्थिरावल्याचे पहिल्या आठवडय़ातील निष्कर्षांतून समोर आले आहे.
या वेब टूलच्या वापरातून रुग्णाची दैनंदिन जीवनपद्धती आणि रक्तदाब यांची सांगड घालता येते. तसेच पद्धतीच्या वापरामुळे रुग्णाच्या पूर्वीच्या आणि आताच्या रक्तदाब पातळीत घट झाल्याचे बेंगत्सन यांनी म्हटले आहे.
या संशोधनात दोघांमधील संभाषण उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाला किफायतशीर असून संवादातून रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा प्रभाव रक्तदाबाचा आजार बळवण्यावर कसा पडतो, याबाबत विश्लेषण करता येते. पण वारंवार होणारा संवादही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
संशोधनात दोन पद्धतींतून रुग्णामधील होणाऱ्या बदलाचे अवलोकन करण्यात येते. पहिल्या टप्प्यात आठ आठवडय़ांत रुग्णाच्या रक्तदाबाच्या पातळीची केलेली नोंद आणि त्यानंतर दुसऱ्या टप्यात रुग्णांमधील बदलाचे श्रवणदृश्य माध्यमातून झालेल्या संभाषणाचे विश्लेषण उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.