सोनी एक्सपेरिया या फ्लॅगशिप फोनवर तब्बल १४,००० रुपयांची सूट देण्यात आली असून सध्या या फोनची किंमत २४,९९० रुपये इतकी झाली आहे. ३८,९९० रुपयांवरुन या फोनची किंमत २४,९९० रुपये करण्यात आली आहे. सध्या या फोनची विक्री फ्लिपकार्टवर होत आहे. या नव्या ऑफरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तीन जीबी रॅम, ६४ जीबी रॅम इंटरनल स्टोरेज आणि २०० जीबी एक्सपांडेबल मेमरी असलेल्या या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५० प्रोसेसर आहे. ग्रॅफाइट ब्लॅक, लाइम गोल्ड, रोज गोल्ड या रंगांमध्ये या फोन उपलब्ध आहे. २३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यामुळे स्पष्ट छायाचित्रे येतील.

एक्सपेरिया एक्सला २,६२० एमएएच बॅटरी आहे. एका चार्जिंगवर दोन दिवस बॅटरी चालू शकते. ड्युएल सिम आणि ४ जी एलटीई कनेक्टिविटी उपलब्ध आहे. हा फोन गुगलच्या अॅंड्रॉइड मार्शमेलो या प्रणालीवर चालतो.
मागील वर्षी जेव्हा हा फोन लाँच झाला होता त्यावेळी याची किंमत ४८,९९० होती. त्यानंतर कंपनीने ही किंमत ३८,९९० वर आणली. आता या फोनची किंमत २४,९९० झाली आहे. एक्स सिरीजमधला एक्सपेरिया हा सर्वात प्रथम फोन आहे.

बाजारात ३ जीबी रॅम असणाऱ्या फोनची संख्या भरपूर आहे. लेनोवो, वनप्लस, हॉनर, रेडमी नोट या स्मार्टफोनमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच फीचर्स आहेत. लेनोवो झेड २ प्लस, वन प्लस ३ टी या फोनला चांगली मागणी आहे. यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठीच सोनी एक्सपेरियाची किंमत कमी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सोनी त्यांच्या नव्या स्मार्टफोनची घोषणा करण्याच्या शक्यता आहे. एक्सपेरिया एक्सच्या पुढील आवृत्तीची घोषणा लवकरच होऊ शकते.