दाढी हे पुरुषांच्या दृष्टीने कंटाळवाणे काम असते. कामाच्या गडबडीत त्यासाठी वेगळा वेळ देणे बरेचदा त्यांना नको वाटते. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये दाढी-मिशी ठेवणे ही स्टाईल परत आली आहे. ‘क्लीन शेव्ह’ पेक्षा ‘स्टायलिश बीअर्ड’ला सध्या पसंती मिळत आहे. सेलिब्रिटी किंवा खेळाडूंनी ही स्टाईल रुजवण्यात मोठीच भर घातली आहे. पुरुषांच्या केशरचनेच्या व बीअर्ड स्टाईल्सच्या या फॅशनबद्दल..

दाढी राखण्याच्या निरनिराळ्या प्रकारांचा व फॅशन्सचा बराच बोलबाला सध्या सगळीकडे आहे. नुकत्याच एका जनजगृती मोहिमेसाठी पाळण्यात आलेल्या ‘नो शेव्ह’ नोव्हेंबर म्हणून नाही, पण एकंदरच अलिकडच्या काळात दाढी व मिशी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अनेक केशरचनाही पुरुष आवर्जून करतात. शेव्हिंग करून स्वच्छ, तुळतुळीत चेहरा ठेवण्याची फॅशन आता मागे पडू लागली आहे. पार्टी असो, मिटिंग असो, स्पोर्ट्स असो किंवा सण-समारंभ आपल्या चेहऱ्याला शोभेल अशी दाढी व मिशी कोरणे हा पुरुषांच्या तयारीचा महत्त्वाचा भाग झाला आहे. परवा एकाच कार्यक्रमात विराट कोहलीसारखी दाढी असलेले, शिवाजी महाराजांसारखी दाढी असलेले दोनतीन जण अनेकांना दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांत पाहायला मिळाले. अगदी महाविद्यालयीन तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाला दाढी-मिशीची ही फॅशन आवडते आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

पुरुषांच्या लूकमध्ये सर्वात मोठा वाटा असतो, तो त्यांच्या दाढी-मिशी व केशरचनेचा. बाकी दागदागिने पुरुषांच्या फॅशनमध्ये स्त्रियांइतके महत्त्वाचे नसतात. गेल्या काही महिन्यात पुरुषांच्या या फॅशनमध्ये बरेच बदल झालेत. बॉलिवूडमधील कलाकारांच्या फॅशनचं वारं तर खूप आधीपासून आपल्याकडे फिरतं. त्यातच आता क्रिकेट किंवा फुटबॉलमधील खेळाडूंसारखीही फॅशन पुरुष करू लागले आहेत. छत्रपती शिवरायांप्रमाणे कोरलेली दाढी व मिशी, तसेच अलिकडची रितेश देशमुखची टॉप नॉटची हेअरस्टाईल व दाढी-मिशी अशा स्टाईल्स पुरुषांना भुरळ घालतात. विराट कोहलीची दाढीची स्टाईल किंवा लोकमान्य टिळकांसारखी मिशी असेही काही प्रकार पुरुष करताना दिसतात.

हेअर स्टाईलिस्ट स्वप्निल सांगले याबाबत सांगतात, ‘आजकाल पुरुषांना क्लीन शेव्ह नको असते, दाढीला ब्लेड न लावता, केवळ ट्रिमरचा वापर करून ते दाढी करतात. शिवाय अनेकांना कोरलेली दाढी हवी असते.’ बाजारात यासाठीची अनेक उत्पादने दाखल झाली आहेत. बीअर्ड ऑइल, वॅक्स, कंडिशनर्स, जेल, फोम किंवा इतरही काही उत्पादने दाढीच्या कंटाळवाण्या कामाला सुकर करण्याचे काम करतात. त्यामुळे दाढी ठेवणे पूर्वीच्या तुलनेत सोपे व सोईचे होते आहे. त्यातच अनेक हेअर स्टायलिस्ट दाढी व केशरचनेचे अनेक नावीन्यपूर्ण प्रकार आता करू लागले आहेत. त्यामुळे पुरुषांना दाढी व केशरचनेतील ही फॅशन खुणावू लागली आहे.

आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार केशरचना किंवा दाढीमिशीची स्टाईल निवडावी, असं अनेक हेअर स्टायलिस्ट सांगतात. केशरचनांमध्ये वन सायडेड स्पाइक्स, स्टँड स्पाइक्स अशा रचना हल्ली पाहायला मिळतात. दाढींमध्ये राउंड, स्क्वेअर, जॉलाइनपर्यंत, फ्रेंच कट असे काही प्रकार दिसतात. विशेष म्हणजे कोणत्याही लूकवर अशा रचना सुंदर दिसू शकतात. त्यामुळे खरोखरच चेहऱ्याच्या आकारानुसार व दाढीच्या वाढीवर तुमच्या स्टाईल्स निवडायला हरकत नाही. फक्त त्यासाठी थोडी काळजी घ्यायला हवी.

bhagyasb@gmail.com