पावसाळ्यात आणि एरवीही अनेक आजार हे दूषित पाण्यातून पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, कॉलरा, डायरिया असे आजार उद्भवू शकतात. हल्ली नोकरी, घर अशी धावपळ असल्याने बाजारात मिळणाऱ्या ब्रॅंडेड वॉटर प्युरीफायरचा पाणी शुद्ध करण्यासाठी वापर केला जातो. मात्र पूर्वी वापरले जाणारे पाणी स्वच्छ करण्याचे उपाय आजही तितकेच फायदेशीर ठरतात. तसेच यामुळे वीजेचीही बचत होते. तसेच ज्याठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध नसते त्यांच्यासाठी तर हे उपाय जास्तच फायदेशीर ठरतात. तेव्हा घरच्या घरी पाणी स्वच्छ करण्याच्या काही खास पद्धती…

१. पाणी गाळून घेणे – वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

२. उकळणे – पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.

३. तुरटी फिरवणे – तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणे ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. मात्र तुरटी फिरवली असली तरीही हा पाणी स्वच्छ करण्याचा म्हणावा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने हे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.

४. नळाला फडके किंवा फिल्टर बसविणे – पावसाळ्याच्या दिवसात नळाला काहीसे मातकट आणि अशुद्ध पाणी येते. त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावे यासाठी नळाला कापड बांधावे किंवा गाळणे लावावे. याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारी वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध असतात. त्यांचा वापरही फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पाण्यातील सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते.